◻ लोणी बुद्रूक येथे सिंधूताई आदिवासी निवारा या गृहप्रकल्पाचे लोकार्पण.
संगमनेर Live (लोणी) | मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या शासकीय पडीक जमीनी घरकुल उभारणीसाठी उपयोगात आणल्या तर वंचित कुटुंबियांना हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा होईल याबाबत शासनाने धोरण घेण्याची गरज असल्याचे मत आ. राधाकृष्ण विखे पाटील यानी व्यक्त केले.
लोणी बुद्रूक येथे ६० कुटुंबियांना त्यांचे वास्तव्य असलेल्या जागेवरच प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना आणि शबरी योजनेच्या माध्यमातून घर उपलब्ध करून देण्यात आली. सिंधूताई आदिवासी निवारा या गृहप्रकल्पाचा लोकार्पण सोहळा आ. विखे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपन्न झाला. माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक डॉ. परिक्षीत यादव, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी आधिकारी श्री. भोर, सभापती सौ. नंदा तांबे, उपसभापती ओमेश जपे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसिलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, माजी उपसभापती सुभाषराव विखे, एम. वाय. विखे, सिनेट सदस्य अनिल विखे, माजी सरपंच लक्ष्मण बनसोडे, माजी उपसरपंच अनिल विखे, सरपंच सौ. कल्पना मैड, उपसरपंच गणेश विखे उपस्थित होते. प्रातिनिधिक स्वरुपात रहिवाशांना घराची उपस्थितांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
आ. विखे पाटील म्हणाले की, अतिशय संघर्षमय परीस्थीतीत ही सर्व कुटंब या जागेत राहात होती. यांना घर मिळावीत मातोश्री सिंधूताईची खूप इच्छा होती. आज हे स्वप्न पूर्ण होतय याचे मोठे समाधान असल्याचे सांगून आ. विखे पाटील म्हणाले की विविध शासकीय विभागांच्या जागा मोठ्या प्रमाणात पडीक असतात. परंतू त्याचा विनीयोग होत नाही. वर्षानुवर्षे या जागांवर अतिक्रमण तसेच राहीली आहेत. परंतू सामाजिक दृष्टिकोनातून विचार झाल्यास या जागांचा उपयोग आशा शासकीय घरकुल योजनांच्या उभारणीसाठी झाल्यास वंचित घटकांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देता येईल. या घरकुलांच्या बाबतीत असा निर्णय भाजप सरकारच्या काळात घेण्यात आला. राज्यातील हा पहिला निर्णय ठरल्याने आहे त्याच जागेवर घर रहिवाश्यांना घर देण्याचा गृह प्रकल्प यशस्वी होवू शकला. भविष्यात ग्रामीण भागात अशा जागांसाठी निश्चित असे धोरण घेवून जर घरकुल योजनांसाठी जागा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला तर त्याचा निश्चितच लाभ वंचित घटकांना होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर म्हणाले की, राज्यातील हा पहिला प्रकल्प लोणी सारख्या गावामध्ये साकार झाला. विविध योजनांच्या माध्यमातून हा प्रकल्प पूर्ण झाल्याने रहिवाश्यांना हक्काचे घर मिळाले आता आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. स्वच्छतेला प्राधान्य द्या आणि अंधश्रद्धेला कोणताही थारा देवू नका. असा संदेश आपल्या भाषणातून त्यांनी लाभार्थ्यांना दिला.
माजी अध्यक्षा सौ. शालिनी विखे पाटील यांनी आपल्या भाषणात या गृहप्रकल्पाच्या शासकीय स्तरावर झालेल्या पाठपुराव्याचा आढावा घेवून सांगितले की, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेला गृहप्रकल्प राज्यात आदर्श ठरला असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. जिल्हा परिषेच्या माध्यमातून या प्रकल्पाचा पाठपुरावा करता आला. या मध्ये सातत्य राहिल्यानेच या प्रकल्पाला मूर्त स्वरुप येवू शकल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी उपसरपंच अनिल विखे यांनी केले. यावेळी लोणी बुद्रूक ग्रामस्थांच्या वतीने आ. विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सर्व मान्यवरांनी घरकुलांची पाहाणी करुन, अंगणवाडीच्या इमारतीचेही उद्घाटन आणि वृक्षारोपणही केले.
याप्रसंगी भाजपाचे प्रकाश चित्ते जेष्ठनेते बापूसाहेब गुळवे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक किशोर नावंदर, गणेश भांड, माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागिरदार, रामभाऊ विखे, दिलीपराव विखे, भाऊसाहेब धावणे, चंद्रकांत म्हस्के, भाऊसाहेब विखे, संतोष विखे, प्रविण विखे, रविंद्र धावणे, संभाजी विखे, गोरक्ष दिवटे, कैलास विखे, मयुर मैड, सरोज साबळे, विनोद पारखे, अर्जुन बोरसे, नवनाथ बोरसे ग्रामविकास आधिकारी सौ. कविता आहेर आदी उपस्थित होते.