संगमनेर Live | मराठा समाजाला शिक्षण व नोकऱ्यांमधील असलेले आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे राज्याभरात मराठा समाज बांधवामध्ये आक्रोश निर्माण झाल्याने या निकालाचे पडसाद उमटत आहेत. मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, रायगडावरून कोल्हापूरातून आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार बुधवारी सकाळी छंत्रपती शाहू महाराज याच्या समाधी स्थाळाला अभिवादन करुन कोल्हापूर येथे भर पावसात मराठा आदोंलनाला सुरवात झाली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी होत असलेल्या या मूक आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार चद्रंकात जाधल, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील सहभागी झाले असून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शशिकांत पवार व जिल्ह्यातील सर्व आमदार सहभागी होणार आहेत.
छत्रपती संभाजीराजे यांनी शिवराज्यभिषेक दिनी रायगडावरून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापूरातून मूक आंदोलनाला सुरूवात करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज सकाळी पहिल्या आंदोलनला सुरवात झाली असून या मूक आंदोलनात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा बांधवासह आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी आदोंलनस्थळी येण्यास सुरवात झाली आहे.