संगमनेर Live | बुधवारी सकाळपासूनचं संगमनेर तालुक्यात ढगाळ वातावरणासह हवेत दमटपणा जाणवत होता. त्यातचं दुपारी १ वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरूवात झाली आणि त्याचा चागलाच फटका आश्वी बुद्रुक येथिल सेट्रंल बँकेला बसला आहे. ४० वर्षापेक्षा अधिक जुन्या असलेल्या इमारतीच्या छतामधून पावसाचे पाणी गळायला लागले. त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात दालनात साचत असल्याने कर्मचाऱ्यासह कामानिमित्त बँकेत आलेल्या ग्राहकाना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.
मागील काही वर्षापासून नेहमी वरदळ असणारी सेट्रंल बँक ही येथिल जुन्या वास्तूतून इतरत्र चागल्या, सुरक्षित व प्रशस्त जागेत हालवण्याची मागणी बँकेचे ग्राहक व नागरीक करत आहेत. परंतू बँक प्रशासन व वरिष्ठ पातळीवरुन ठोस पावले उचलली जात नसल्यामुळे ग्राहकाना कायम मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून पार्किंगची समस्या असल्याने बँकेसमोर नेहमी वाहतूक कोडीं पाहवयास मिळत असते.
बुधवारी मान्सूनच्या पहिल्याच जोरदार पावसात जिर्ण वास्तूत असलेली सेट्रंल बँकेची इमारत गळण्यास सुरवात झाल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भिती ग्राहकानी व्यक्त करुन आश्वी परिसरातील १० ते १५ गावातील नागरीकाची अर्थिक व्यवहारासाठी ये-जा या बँकेत असल्यामुळे ही बँक सुरक्षित व प्रशस्त ठिकाणी हालवण्याची मागणी नागरीकाकडून होत आहे.
दरम्यान आश्वी पंचक्रोशीतील अनेक गावानमध्ये मान्सूच्या पहिल्या पावसाने जोरदार फटकेबाजी केली. त्यामुळे सर्वत्र पाणीच - पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यानमध्ये नव चैतण्याचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
परिसरातील १० गावातील नागरीक अर्थिक व्यवहारासाठी बँकेचा वापर करत असतात. बँकेची इमारत ही ४० वर्षापेक्षा अधिक जुनी असून जास्त भाड्याची अपेक्षा असल्याने बँकेला कोणीही सुसज्ज इमारत भाडेतत्त्वावर देण्यास तयार नाही. दुसरीकडे बँक हलावल्यास जास्त दिवसाचा करार करावा लागेल व त्यामुळे ग्राहकाची गैरसोय होऊ शकेल. बँक सुरक्षित व प्रशस्त ठिकाणी हालवण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न सुरु असल्याची माहिती आश्वी बुद्रुक येथिल सेट्रंल बँकेचे शाखा व्यवस्थापक सचिन ढवळकर यानी दिली आहे.