संगमनेर Live | राज्याचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यानी नुकताचं निळवंडे डाव्या कालव्याच्या पाहणीचा दौरा होता. या दौऱ्यात जेष्ठ कार्यकर्ते प्रल्हादराव मुर्तडक याना गर्दीत उभे राहिलेले पाहुन ना. थोरात यानी हाक मारुन स्वंत:जवळ बसवून विचारपुस केली. ना. थोरात हे राज्याचे महसूलमंत्री आहेत. रोज हजारो लोकाना ते भेटत असले तरी अशा घटना या दुर्मिळपणे घडत असतात. त्यामुळे या घटनेची माहिती ना. बाळासाहेब थोरात यांच्या सोशलमिडीयाचे धुरा यशस्वीपणे साभाळणारे विशाल काळे यानी सोशलमिडीयाच्या माध्यमातून दिली आहे.
विशाल काळे यानी यात म्हटले आहे की, कौठे कमळेश्वर, काथरवाडी, मेंढवण आणि लोहारे येथील ६४ ते ७० किलोमीटर च्या डाव्या कालव्याची पाहणी व इतर विकासकामांची पाहणी ना. बाळासाहेब थोरात यानी घेतल्यानतंर लोहारे ग्रामस्थांच्या आग्रहाखातर येथील आवजीनाथ बाबांच्या मंदिरात छोटेखानी संत्काराला उपस्थित झाले होते. यावेळी समोरच्या गर्दीत काठीच्या आधारे उभ्या असलेल्या वयस्कर व्यक्तीकडे त्याचे लक्ष गेले व त्यानी त्या व्यक्तीस ओळखले होते. ते वयस्कर व्यक्ती हे मिरपूर येथील कॉग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते प्रल्हादराव मुर्तडक असल्याने साहेबांनी लगेच त्यांना आवाज दिला व म्हणाले "प्रल्हादराव पुढे येऊन बसा.!"
साहेबांनी आवाज दिल्यानंतर मुर्तडक हळूहळू काठी टेकवत पुढे आले आणि साहेबांनी त्यांना प्रेमाने अगदी जवळ बसवले. त्यांची आस्थेवाईक पणे तब्येतीची विचारपुस केली, त्यांच्यासोबत मनमोकळ्या पणाने गप्पाही मारल्या. एक साधारणशी दिसणारी वयस्कर व्यक्ती, खरंतर राजकीय कार्यक्रमात दुर्लक्षित राहते. पण ना. थोरात साहेबांनी स्वतः आपुलकीनं जवळ बसवून चौकशी केल्याने उपस्थित ग्रामस्थ आश्चर्यचकित झाले होते.
विशाल काळे पुढे म्हणतात प्रल्हादराव मुर्तडक यांच्याबद्दल सांगायचे झाले तर ते तिर्थरूप स्व. भाऊसाहेब थोरात (दादा) पासून ते आजपर्यंत ना. बाळासाहेब थोरात यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. ना. साहेबांचा त्या भागातील कोणत्याही गावात दौरा असल्यावर ते त्याठिकाणी आवर्जून उपस्थित राहतात. ना. थोरात साहेबांनी तिर्थरूप दादांच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आवर्जून सन्मानाने जपले आहे. एवढ्या मोठ्या पदावर असूनही सामान्य निष्ठावान कार्यकर्त्याप्रति मायेचा ओलावा, जवळीक त्यांनी आजही जपली आहे. हे या प्रसंगावरून दिसून येत असल्याचे सोशलमिडीयावरील पोस्टमध्ये लिहले आहे.