सरकारी नोकरी, सरकारी योजना आदिच्या सविस्तर माहितीसाठी येथे Click करुन चॅनलला सबस्क्राईब करा.
◻ पत्रकार रवीद्रं बालोटे याच्यां घराशेजारील गोठ्यात बिबट्याचा धुमाकुळ.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथिल पत्रकार रवीद्रं बालोटे यांच्या गोठ्यात बांधलेल्या कालवडीला मध्यरात्री बिबट्याने हल्ला करुन ठार केल्यामुळे पत्रकार बालोटे याचे अंदाजे १५ हजाराचे नुकसान झाले असून हा बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी स्थानिक नागरीकानी केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पत्रकार रवीद्रं बालोटे यांचे गट नंबर ५६/२ मध्ये राहते घर व जनावराचा गोठा असून मंगळवारी मध्यरात्री बालोटे कुटुंब गाढ झोपेत असताना ३ वाजेच्या सुमारास शिकारीच्या शोधात असलेल्या बिबट्याने बंदीस्त गोठ्यात ९ फूट जाळीवरुन उडी मारत प्रवेश केला. यावेळी गोठ्यात बाधलेल्या कालवडीवर हल्ला करत बिबट्याने कालवड ठार केली. त्यामुळे गोठ्यातील इतर जनावरानी आरडाओरडा करण्यास सुरवात केल्याने पत्रकार बालोटे यानी गोठ्याकडे धाव घेऊन मोठ्या धाडसाने बिबट्याला हुसकावून लावले.
सकाळी बालोटे यानी वनविभागाला हल्ल्याची माहिती दिली. माहिती मिळताच वनपाल पी. जे. पुंड, बाळासाहेब डेगंळे आदिनी घटनास्थळी दाखल होत घडलेल्या घटनेचा पंचनामा केला असून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शिदें याबाबत आवहाल वरिष्ठाना कळवला आहे. तर कालवडीच्या मृत्यूमुळे अंदाजे १५ हजाराचे नुकसान झाल्याची माहिती पत्रकार बालोटे यानी दिली आहे.
दरम्यान शेतकऱ्याच्या पशुधनावर हल्ले करुन दहशत निर्माण करणारा बिबट्या वनविभागाने तात्काळ जेरबंद करावा अशी मागणी जेष्ठ नेते विनायकराव बालोटे, भगवानराव इलग, प्रभाकर निघुते, हरिभाऊ ताजणे, दत्तु सांगळे, संतोष बालोटे, अनिस शेख, गणेश मुनमुने आदिसह परिसरातील शेतकऱ्यानी केली आहे.