◻ लाखाचे सोने तर रोख रक्कम ही चोरट्यानी पळवली.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे गुरुवारी पहाटे धुमाकूळ घालत बंद घरातुन सोने, रोख रक्कमेसह इतर वस्तू चोरुन नेल्याची घटना घडल्याने आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आश्वी खुर्द येथे चोऱ्या सुरु झाल्याने नागरीकानमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात हर्षद विलास बागुल (हल्ली रा. आश्वी खुर्द, मुळ रा. कौठे-मलकापूर, ता. संगमनेर) यानी दाखल केलेल्या तक्रांरीत म्हटले आहे की, मी आश्वी खुर्द येथे भाडेतत्त्वावर राहत असून मी माझ्या खाजगी कामासाठी लहान भाऊ विलास बागुल याच्याकडून त्याची तीन तोळ्याची चेन घेऊन आलो होतो. ती चेन मी घरातील कपाटामध्ये ठेवली होती. त्यामध्ये माझ्या मुलाचे दागिने व काही रक्कम होती. मी घराला कुलुप लाऊन माझ्या मुळ गावी गेलो होतो.
२४ जून रोजी सकाळी माझे घराशेजारी राहणाऱ्या अशोक शिदें यानी मला फोन करुन घराला कुलुप लावले नसल्याची माहिती दिली. त्यानतंर माझ्या मित्रानी घरातील सामान अस्ताव्यस्त पडल्याची माहिती दिल्यामुळे मी घरी येऊन पाहणी केली असता कपाटून तीन तोळे वजणाची १ लाख ५ हजार रुपये किमंतीची चेन, १ हजार ५०० रुपये किमंतीच्या बाळ्या, ८ हजार रुपये किमंतीच्या दोन लहान अंगठ्या व ५ हजार रुपये रोख असा एकून १ लाख १९ हजार ५०० रुपयेचा ऐवज चोरीला गेल्याचे दाखल तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान आश्वी पोलीस ठाण्यात गुरंव नंबर ११४/२०२१ नुसार भादंवी कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आर. बी. भाग्यवान हे करत आहे.
आश्वी खुर्द येथे गुरुवारी पहाटेच्या सुमारास सावरकर चौकातील मोहित गायकवाड, माणिक भालेराव तसेच व्ही. डी. वर्पे यांचे भाडेकरु असलेले सोमनाथ काळे तर तान्हाजी नगर येथिल उत्तम बनसोडे व श्रीमती कदम याच्या दरवाजाची कडी-कोडां तोडण्याचा प्रयत्न केला तर बागुल याचे घर वगळता इतर ठिकाणी चोरट्याच्या हाती काही ही लागले नाही. तसेच मोरया शॉपी येथेही चोरटे आले होते. तसेच आश्वी शिबलापूर रस्त्यालगत हॉटेल मंगेश शेजारी राहत असलेल्या एका शिक्षकाची दुचाकी ही चोरीला गेल्याची माहिती स्थानिकानी दिली असून आश्वी खुर्द येथे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून या चोरट्याना जेरबंद करावे अशी मागणी नागरीकानी केली आहे.