◻ इंद्रजीत थोरात यांनी केली थोरात कारखान्याच्या ऑक्सीजन प्लांटची पाहणी.
संगमनेर Live | राज्याचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना सुरू करत असलेल्या नव्या ऑक्सीजन निर्मिती प्लांट च्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून यातून येत्या तीन ते चार दिवसांमध्ये ऑक्सिजन निर्मिती सुरू होणार आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यात या प्लॅटच्या उभारणी कामाची पाहणी थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी केली.
कोरोनाच्या दुसर्या लाटेत सर्वत्र ऑक्सिजनची कमतरता भासू लागल्याने यावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने नवा ऑक्सीजन प्लांट निर्मितीचा निर्णय घेतला. तैवान येथून ही अद्ययावत मशिनरी मागवली असून यामधून दररोज अकराशे किलो ऑक्सिजन गॅसची निर्मिती होणार आहे. या प्लांटच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून येत्या तीन-चार दिवसांमध्ये शासकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर या प्लांट मधून ऑक्सिजनचे नियमित उत्पादन सुरू होणार आहे. यामुळे संगमनेर शहर व परिसरातील रुग्णालय आणि कोरोना रुग्णांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.
यावेळी इंद्रजीत थोरात म्हणाले की, थोरात कारखान्याने कायम तालुक्याचे हृदय म्हणून काम केले आहे. तालुक्यातील प्रत्येक सुखदु:खात कारखान्याचा सहभाग मोठा राहिला आहे. कोरोना संकटात थोरात कारखान्याच्या वतीने ५०० बेडचे कोवीड केअर सेंटर सुरू करण्यात आले. याच बरोबर वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आल्या. ऑक्सिजनची कमतरता पाहून राज्याचे नेते महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने नवा ऑक्सीजन निर्मिती प्लांट उभारणीचा निर्णय घेण्यात आला असून सर्व शासकीय पूर्तता करून येत्या तीन दिवसांमध्ये यामधून प्रत्यक्ष ऑक्सिजन निर्मिती होणार असल्याची माहिती दिली.