◻ आश्वी बुद्रुक येथे सोमवारी दुपारपर्यत वीज पुरवठा खंडीत राहण्याची शक्यता.
संगमनेर Live | रविवारी दुपारच्या सुमारास आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक शिवारातील आश्वी - प्रतापपुर रस्त्यालगत असलेले लिबांचे झाड वीज वाहक तारेवर कोसळल्यामुळे भाजी विक्रेते ज्ञानदेव ताजणे थोडक्यात बचावले आहे.
आश्वी बुद्रुक येथे रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पावसाचे दिवस असल्याने सोसाट्याचा वारा वाहत होता. यावेळी सुमतीलाल गांधी यांच्या आश्वी - प्रतापपुर रस्त्यालगत असलेल्या शेतातील १०० वर्ष जुने लिबांचे झाड अचानक वीज वाहक तारावर कोसळले. याचं झाडाच्या सावलीखाली भाजी विक्री करण्यासाठी बसलेले ज्ञानदेव ताजणे हे लांब पळाल्याने थोडक्यात बचावले असून झाड पडल्यामुळे वीज वाहक ताराचे मोठे नुकसान झाले आहे.
कोरोना नियमामुळे आठवडे बाजार बंद असल्याने मागील १ वर्षापासून (लॉकडाऊन) मोठ्या प्रमाणात फळे व भाजी विक्रेते आश्वी - प्रतापपुर रस्त्याच्या दुतर्फा बसून व्यवसाय करत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरीकाची खरेदीसाठी मोठी वर्दळ याठिकाणी नेहमी पहावयास मिळत असते. सुदैवाने रविवारी नागरीकाची ये-जा कमी असल्याने लिबांचे झाड पडल्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडलेली नाही.
दरम्यान झाड कोसळल्यामुळे महावितरणचे मोठे नुकसान झाले असून आश्वी बुद्रुक येथे खंडीत झालेला वीज पुरवठा सोमवारी दुपारपर्यत पुर्ववत केला जावा यासाठी महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून युध्दपातळीवर कामाला सुरवात केल्याची माहिती मिळाली आहे.