◻ निमगावजाळी येथिल रेस्टहाऊसवर चोरट्यानी केला हात साफ तर दाढ खुर्द येथून दुचाकी घेऊन पलायन.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी जिल्हापरिषद गटातील गावानमध्ये मागील काही दिवसापासून भुरट्या चोरानी दहशत निर्माण केली असून आश्वी खुर्द नतंर आता निमगावजाळी व दाढ खुर्द येथेही चोरी झाल्याच्या घटना उघडकीस आल्या असून आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या चोरट्याच्या भितीने परिसरातील नागरीकानमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून या चोरट्याना जेरबंद करण्याचे मोठे आवाहन आश्वी पोलिसांनपुढे उभे ठाकले आहे.
याबाबत बबन बाबुराव ओहळ यानी आश्वी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रांरीत म्हटले आहे की, दि. २७ ते २८ जून दरम्यान निमगावजाळी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रेस्टहाऊसच्या दरवाजाचा कडी - कोडां तोडून आज्ञात चोरट्याने आतमधील चार सिलिंग पखें व नळाचे तीन कॉक असा ४ हजार ३०० रुपये किमंतीचा मुद्देमाल चोरुन नेल्याची तक्रांर दाखल केली आहे. त्यामुळे गुरंव नबंर ११७/२०२१ नुसार भादंवी कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पोलीस नाईक पारधी हे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहे.
दुसऱ्या चोरीच्या घटनेबाबत रखमा साहेबराव जोशी यानी दाखल केलेल्या तक्रांरीत म्हटले आहे की, दि. २४ जून रोजी दाढ खुर्द शिवारातील राहत्या घरासमोरुन मध्यरात्री बजाज कंपनीची प्लँटीना ( एम. एच. १७ बी.बी. ४२०२) ही १५ हजार रुपये किमंतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. त्यामुळे आश्वी पोलीस ठाण्यात गुरंव नबंर ११६/२०२१ नुसार भादंवी कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून हवालदार भाग्यवान हे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
दरम्यान आश्वीसह परिसरात मागील काही दिवसापासून चोरट्यानी दहशत निर्माण केली असून मागील आठवड्यात आश्वी खुर्द येथे चार ते पाच ठिकाणी चोरीचा प्रयत्न करत एका ठिकाणी चोरी करण्यात तसेच एक दुचाकी चोरुन नेण्यात चोरटे यशस्वी झाले होते. त्या चोऱ्याचा पोलीसाकडून तपास सुरु असतानाचं निमगावजाळी व दाढ खुर्द येथे पुन्हा चोरी झाल्याने नागरीकानमध्ये भितीचे वातावरण असून पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर व त्याच्या सहकार्यापुढे या भुरट्या चोराना जेरबंद करण्याचे मोठे आवाहन उभे ठाकले आहे.