◻ चार वाजेनतंर दुकाने व सर्व आस्थापने बंद.
संगमनेर Live | कारोना संसर्गामुळे अहमदनगर जिल्ह्याचा समावेश स्तर तीनमध्ये झाल्यामुळे जिल्ह्यात पुन्हा जिल्हाधिकारी डॉ. राजेद्रं भोसले यानी कडक निर्बंध लागू झाल्याचे आदेश शनिवारी काढले आहेत.
पॉझिटिव्हिटी रेट व ऑक्सिजन बेडवरील रुग्णांचे प्रमाण या आधारे निबंधस्तर जाहीर करण्यात आले होते. त्यात नगर जिल्हा क्रमांक एकमध्ये असल्याने ६ जूनपासून जिल्ह्यातील सर्व निर्बंध उठवण्यात येऊन व्यवहार सुरळीत झाले. मात्र आता २० दिवसांनंतर नगर जिल्ह्याचा समावेश स्तर तीनमध्ये झाला असल्याने नवीन निर्बध शासनाकडून लागू करण्यात आले आहेत.
त्यानुसार सायंकाळी पाचनंतर सकाळी ५ वाजेपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून सर्व दुकाने व आस्थापने दुपारी चार वाजेनतंर बंद राहणार आहेत. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार व रविवार पूर्णपणे कडक लॉकडाऊन असणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शनिवारी काढले आहेत.
असे आहेत नवे निर्बध..
हॉटेल, रेस्टॉरंट - ५० टक्के क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दु. ४ (४ नंतर केवळ पार्सल तर शनिवार व रविवार केवळ पार्सल)
सार्वजनिक ठिकाणे, खुले मैदाने, सायकलिंग व मॉनिंग वॉक सकाळी ५ ते सकाळी ९ वाजेपर्यत
खासगी आस्थापना, कार्यालये दुपारी ४ वाजेपर्यंत तर खासगी, सरकारी कार्यालयीन उपस्थिती ५० टक्के, खेळ (मैदानावरील) सकाळी ५ ते सकाळी ९ व साय ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत
सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ (५० टक्के मयदित), विवाह समारंभ ५० व्यक्तीच्या उपस्थितीत. अंत्यविधी २० व्यक्तींच्या उपस्थितीत.
स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांच्या बैठका, निवडणुका, वार्षिक सभा या आसनक्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीत, बांधकाम - फक्त बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी राहणाऱ्या मजुरांकरवी किंवा कामगारांना ४ वाजता सोडणे बंधनकारक राहील.
कृषी संबंधित दुकाने, आस्थापना - सकाळी ७ ते दुपारी ४ -ई - कॉमर्स (वस्तू व सेवा) - नियमितपणे सुरू राहतील. जिम, सलून, ब्युटीपार्लर, स्पा, वेलनेस सेंटर हे सकाळी ७ ते दु .४ वाजेपर्यत
सार्वजनिक बस वाहतूक १०० टक्के क्षमतेने तर कार्गो वाहतूक (केवळ ३ व्यक्ती) नियमित सुरू राहील. आंतरजिल्हा प्रवास (खासगी बस, कार, टॅक्सी) नियमित सुरू तर स्तर ५ मधील जिल्ह्यांत जाण्याकरिता निर्बध - तेथे थांबणार असाल तर ई - पास आवश्यक, उत्पादन घटक कंपन्या - नियमित सुरू राहील.