संगमनेर तालुक्यातील ६३ गावे झाली कोरोनामुक्त.

संगमनेर Live
0
सरकारी नोकरी, सरकारी योजना आदिच्या सविस्तर माहितीसाठी येथे Click करुन चॅनलला Subscribe करा.

कॉम्प्युटर नॉलेज तसेच विडिओ गेमिगंसाठी येथे Click करा व चँनल Subscribe करा.

महसूलमंत्री ना. थोराताचा संगमनेर पॅटर्न ठरला दिशादर्शक.

संगमनेर Live | कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत राज्याचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर मधील प्रशासन व गावागावातील स्थानिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून संगमनेर तालुक्यात नागरिकांच्या सर्वाधिक कोरोना चाचण्या झाल्या असून ६३ गावे कोरोना मुक्त झाली आहेत. तर तालुक्यातील २९ गावे कोरोना मुक्तीच्या वाटेवर आहेत.

देवकौठे ते बोटा असा शंभर किलोमीटरचा विस्तीर्ण अशा संगमनेर तालुक्यात १७१ गावे व २६३ वाड्या-वस्त्या आहेत. पुणे, नाशिक या शहरांशी जवळीक व जादा दळणवळण यांसह संगमनेर मध्ये असलेली चांगली वैद्यकीय सुविधा यामुळे संगमनेर शहरात कोपरगाव, राहाता, जुन्नर, पारनेर, अकोले, सिन्नर या तालुक्यांमधून अनेक नागरिक कोरोना उपचारांसाठी येत असतात. महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात हे राज्य पातळीवर महत्त्वाची जबाबदारी सांभाळत असताना सुद्धा अहमदनगर जिल्हा व संगमनेर तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या थांबवण्यासाठी ते सातत्याने प्रशासनाला सूचना देत होते. यानुसार संगमनेर तालुक्यात अहमदनगर जिल्ह्यातून सर्वाधिक कोरोना चाचण्या झाल्या. याच बरोबर घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करण्यात आली. गावागावात ग्राम आरोग्य रक्षक दलातील युवकांनी कार्यक्षमपणे काम करून काही लक्षणे आढळल्यास तातडीने विलगीकरण केले. विविध ठिकाणी कोवीड केअर सेंटर उभे करून नागरिकांना अत्यंत चांगल्या सुविधा दिल्या. या संगमनेर पॅटर्नमुळे कोरोना लढ्याचे आदर्शवत मॉडेल तयार झाले.

नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण रुग्णालय व कॉटेज हॉस्पिटल करीता चार रुग्णवाहिका, पाच बायपप मशीन, तालुकास्तरावरील पहिले आरटीफीसीआर मशीन, दहा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यांसह अनेक आधुनिक सुविधा वाढविण्यात आल्या. याचबरोबर नागरिकांच्या लसीकरणासाठी ही विशेष मोहीम राबवली गेली. या विविध उपाययोजनांमुळे आज संगमनेर तालुक्यातील ६३ गावे कोरोनामुक्त झाली असून २९ गावे कोरोना मुक्तीच्या वाटेवर आहे. 

कोरोना मुक्त गावांमध्ये आभाळवाडी, आंबी दुमाला, आंबीखालसा, आश्वी बुद्रुक, आरामपूर, आजमपूर, औरंगपूर, बाळापुर, बांबळेवाडी, भोजदरी, बिरेवाडी, बोरबन, चणेगाव, चिकनी, चिंचपुर बुद्रुक, चिंचपूर खुर्द, दाढ, दरेवाडी, देवकौठे, ढोलेवाडी, धुपे, डोळासणे, आनंदवाडी, हसनाबाद, हिवरगाव पठार, जांबुत खुर्द, जुनेगाव, काकडवाडी, कनकापूर, कणसेवाडी, करुले, कवटेवाडी, कौठे मलकापूर, काळेवाडी, खांडगेदरा, खरशिंदे, कोकणेवाडी, कोंची, कुंभारवाडी, कुरण, कुरकुंडी, कुरकुटवाडी, महालवाडी, माळेगाव पठार, मांची, मेंगाळवाडी, म्हसवंडी, नांदुरी दुमाला, निमगाव खुर्द, निमगाव टेंभी, ओझर बुद्रुक, पारेगाव बुद्रुक, पेमरेवाडी, प्रतापपूर, रायते, सारोळे पठार, सावरगाव घुले, शेळकेवाडी, शेंडेवाडी, शिंदोडी, शिरसगाव, विद्यानगर, वनकुटे, वडझरी खुर्द या गावांचा समावेश आहे. तर तालुक्यातील २९ गावांमधील उपचार घेत असलेले रुग्ण कोरोना मुक्त होणार आहे. यामुळे एकच दिवसात संगमनेर तालुक्याची कोरना मुक्त संख्याही शंभरच्या जवळ होणार आहे.

महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे, इंद्रजीत थोरात, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप, डॉ. संदीप कचोरीया, डॉ. राजकुमार जऱ्हाड, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, मुकुंद देशमुख, सुनील पाटील, सुधाकर मांडवकर यांसह प्रशासनातील विविध अधिकार्‍यांसह विविध शासकीय विभागातील कर्मचारी, शिक्षक, आरोग्य सेविका व अंगणवाडी, सेविका, डॉक्टर, नर्स व गावातील पदाधिकारी यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने अहोरात्र काम करत आहेत.

दरम्यान संगमनेर मॉडेल यशस्वी होत असल्याने संगमनेर तालुक्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरु झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !