◻ डॉ. विखे पाटील हॉस्पिटल मध्ये उपचार घेणाऱ्या ७० वर्षीय आजीने केली कोरोनावर मात.
संगमनेर Live (नगर) | देशासह महाराष्ट्रात कोरोना संसर्गचे प्रमाण पहिल्या लाटे पेक्षा दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर वाढत असताना या नकारात्मक वातावरणातही एक ऊर्जा देणारी सकारात्मक बातमी म्हणजे डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल मधून आली आहे. गंगुबाई बर्डे या ७० वर्षीय (रा. वरवडे, ता. राहुरी) आजींनी १४ दिवस कोरोनाशी झुंज देऊन कोरोना वर यशस्वी मात केली.
मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येत होणारी वाढ, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बॅडची कमतरता जाणवत होती. अशातच मुळा धरणाच्या दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी समाजाच्या गंगुबाई बर्डे याना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांचा मुलगा अंकुश बर्डे याने वेळेत चाचण्या केल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आईसाठी ऑक्सिजन व्हेंटिलेटर बेड ची उपलब्धता व्हावी यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु सगळीकडे नकार घंटा मिळाल्याने त्याने हताश होऊन सरळ खासदार डॉ सुजय विखे याची भेट घेऊन आईची ऑक्सिजन पातळी ४८ ते ५० पर्यंत खालावल्याची तसेच एचआरसिटी स्कोर २२ असल्याची माहिती दिली.
त्यामुळे खासदार डॉ. विखे यानी बैठक सोडून आजीकडे धाव घेत त्यांना मानसिक आधार दिला. त्यानतंर आजीला विळद घाटातील डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून दिला. आज दि. ७ जून रोजी कोरोनावर यशस्वीपणे मात करणाऱ्या वयोवृध्द आजीने आठवणीने खा. डॉ. सुजय विखे पाटील यांचे वेळेवर केलेल्या चांगल्या उपचारांबद्दल आत्मियतेने जवळ घेवून गोरगरिबांसाठी असेचं कार्य करत राहा असा आशीर्वाद दिला आहे.
दरम्यान खा. डॉ. विखे यानी माझ्या आईला मानसिक आधार तसेच व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करुन दिल्यामुळेचं माझी आई कोरोनावर यशस्वी मात करू शकली. असे म्हणून आजीचा मुलगा अंकुश बर्डे याने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे आभार मानले आहे.