मिशन राहत मुळे नगर जिल्ह्यातील ७० करोना बाधित कुटुंबांना मिळाले २१ लाख रुपये.

संगमनेर Live
0
जिल्ह्यातील बाधीत कुटुंबांना संपर्काचे आवाहन.
 
संगमनेर Live (अहमदनगर) | मिशन राहत अंतर्गत कोरोनामुळे कमावती व्यक्ती दिवंगत झालेल्या परिवारांसमोर सध्या समस्यांचा पर्वत उभा आहे. शासनाकडून बऱ्याच घोषणा झाल्या असल्या तरीही अद्याप बाधित परिवरापर्यंत मदतीचा हात पोहोचलेला नाही. अशा स्थितीत प्रत्येक बाधित परिवारास ३० हजार रुपये मिळण्यासाठी Give India यांच्या सहयोगाने स्नेहालय परिवाराने सुरू केलेले ‘स्नेह सहयोग’ अभियान सर्वस्व गमाविलेल्याना जगण्याची आशा देत आहे.
आज अखेर रुपये २१ लाख नगर जिल्ह्यातील ७० बाधीत परीवारांच्या खात्यात थेट जमा करण्यात आले.

स्नेहालय संस्थेचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रवीण मुत्याल आणि अनाम प्रेमचे अजित कुलकर्णी यांनी या उपक्रमाचा समन्वय केला. कमावता व्यक्ती गमावलेल्या बाधित कुटुंबांना १० हजार रुपयांची मदत तातडीचे उपचार आणि किराणा करीता मिशन राहत ने दिली. राहत उपक्रमाचे समन्वयन करणाऱ्या अनामप्रेम संस्थेतर्फे त्याचे वितरण करण्यात येत आहे. स्वर्गीय विश्वनाथराव बिरेवार फाउंडेशन तर्फे त्यासाठी बीजसहयोग मिळाला. इतर दाते अशा बाधित कुटुंबांची मदत करण्यासाठी सहयोग देत आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील ३५०० कुटुंबांशी मिशन राहत टीमने थेट संपर्क केला आहे. युवानिर्माण प्रकल्पाचे स्वयंसेवक घरोघर जाऊन कुटुंबीयांकडून आर्थिक सहयोगासाठी आवश्यक पुर्तता करुन घेत आहेत.

इतर जिल्ह्यात विविध ३१ संस्थांना या उपक्रमासाठी स्नेहालय परिवाराने प्रोत्साहित आणि प्रशिक्षित केले आहे. महाराष्ट्रातील किमान ५० हजार बाधित परीवारांपर्यांत मदतीचा हात पोहोचता करण्याचे उद्दिष्ट मिशन राहत ने ठेवले आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी आणि या उपक्रमात स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी 9011020174 आणि 9011026485 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन राहत टीमने आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !