संगमनेर Live | सासरच्या छंंळाला कंटाळून संगमनेर तालुक्यातील हिरेवाडी येथे सपना सोमनाथ गेठे (वय - २४) या विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता. ३० जून) सकाळी उघडकीस आली आहे.
याबाबत घारगांव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ९ मार्च रोजी सपना सोमनाथ गेठे (वय - २४) हिचा विवाह समनापूर येथील सोमनाथ पांडुरंग गेठे याच्याशी झाला होता. पतीसह सासरा पांडुरंग किसन गेठे, दिर बाळु पांडूरंग गेठे व सासु सुमनबाई पांडुरंग गेठे हे सर्व राहणार समनापूर यांनी विवाहितेच्या चारीत्रयावर संशय घेऊन तिचा वेळोवेळी शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक छळ करत होते.
तसेच ट्रँक्टर घेण्यासाठी माहेरहुन २ लाख रुपये आणण्याची मागणी केली. तर तिच्या अंगावरील दागीने काढून घेत तिला नांदवणयास नकार दिला होता. त्यानंतर वडील सावळेराम लहानू खेमनर हे तिला माहेरी घेऊन आले होते. सोमवारी सकाळी ती घराबाहेर पडली होती. मात्र उशीर होऊनही घरी न आल्याने तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती कुठेच सापडली नाही. बुधवारी सकाळी विहिरीत या विवाहितेचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी संगमनेर येथिल कुटीर रुग्णालयात पाठवण्यात आला होता.
दरम्यान शवविच्छेदनानतंर नातेवाईकानी मृतदेह घारगांव पोलिस स्टेशन आवारात आणत जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे सावळेराम लहानु खेमनर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलीसानी गुरंन १६०/२०२१ नुसार भादंवी कलम ३०६, ४९८ (अ), ४०६, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे आरोपी सोमनाथ पांडुरंग गेठे, पांडुरंग किसन गेठे, सुमनबाई पांडुरंग गेठे व बाळू पांडुरंग गेठे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोसई डी. पी. राऊत हे करत आहेत.