◻ आश्वी पोलीस स्टेशनच्या पुढाकारातून सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील व नागरीकाची बैठक.
संगमनेर Live | दिवसे - दिवस वाढत असलेल्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी नगर जिल्ह्यातील बहुतांशी गावांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला असून याचाच भाग म्हणून आपत्कालीन परिस्थितीत गावातील शेकडो मोबाईल एकाच वेळी वाजणार आहेत. त्यातून सर्व ग्रामस्थांना आपत्कालीन परिस्थितीची माहिती होऊन तत्काळ मदत मिळणार आहे. यासाठी आश्वी पोलीस ठाण्याच्या पुढाकारातून आश्वीसह पंचक्रोशीतील गावानमधील सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदंस्य व नागरीकाची नुकतीच बैठक पार पडली आहे.
या बैठकीसाठी ग्रामसुरक्षा यंत्रणेचे संचालक डी. के. गोर्डे, पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन पाटील, पोलीस पाटील संघटनेचे संगमनेर तालुकाध्यक्ष अशोकराव थेटे, दिलिप डेगंळे, पत्रकार संजय गायकवाड, पत्रकार रवीद्रं बालोटे, संरपच सतीष जोशी, नितिन सांगळे, किरण भुसाळ, विक्रम थोरात, उपसरपंच नानासाहेब उंबरकर आदिसह पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील आदिसह नागरीक उपस्थित होते.
यावेळी डी. के. गोर्डे, व पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यानी ग्रामसुरक्षा यंत्रणेबाबत सविस्तर माहिती दिली. पुर्वी प्रतिकुटुंब २५० रुपये वार्षिक खर्च असलेली यंत्रणा आता केवळ प्रति कुटुंबासाठी एका वर्षासाठी ५० रुपये अशा अत्यंत कमी खर्चात ही यंत्रणा गावांमध्ये कार्यान्वित होणार असल्याने परिसरातील प्रत्येक गावांने आधुनिक ग्रामसुरक्षा यंत्रणा सुरू करण्याचे आवाहन त्यानी यावेळी उपस्थिताना केले.
आधुनिक ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित झाल्यानतंर दरोडा, वाहनचोरी, रस्ता लूट, महिला व लहान मुलांसंदर्भातील गुन्हे, अपघात, वन्यप्राण्यांचा हल्ला तसेच गावाला सतर्कतेचा इशारा यांची माहिती एका टोल फ्री क्रमांकावर यंत्रणेत सहभागी झालेल्या सर्व सदस्यांना एकाचवेळी मिळणार असून ही यंत्रणा अनेक दिवसांपासून आदर्श गाव हिवरे बाजार येथे वापरली जात असल्याची माहिती उपस्थितानी यावेळी दिली.
ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत एखाद्या आपत्कालीन घटनेचा संदेश एकदाच वितरित होत आहे. त्यामुळे एखाद्या घटनेबाबत कितीही नागरिकांनी फोन केला तरी नागरिकांना विनाकारण वारंवार कॉल जात नसल्याने मनस्ताप होत नाही. ग्रामसुरक्षा यंत्रणा सर्व ग्रामस्थांना आपत्कालीन घटनेची माहिती देत असल्याने तत्काळ मदत मिळत असते.
दरम्यान अडीज हजार गावानमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित असून तेथे गुन्हेगारीचे प्रमाण थांबले असल्याची माहिती देण्यात आली असून यामुळे नागरीक व गाव सुरक्षित राहणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच जिल्हाप्रशासनाने या यंत्रणेवर खर्च करण्याची मुभा प्रत्येक ग्रामपंचायतीला दिली असल्याने लवकरचं आश्वी सह पंचक्रोशीतील गावानमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचा मानस उपस्थितानी बोलुन दाखवला.
आश्वी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावानमध्ये आधुनिक ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर गुन्हे व गुन्हेगारांची संख्या कमी होऊन गावे सुरक्षित होणार असल्याने प्रत्येक गावाने यामध्ये सहभागी होणे गरजेचे आहे.
सुधाकर मांडवकर
पोलीस निरीक्षक, आश्वी पोलीस ठाणे.