◻ तालुक्यातील खंडेरायवाडी, वाघापुर, मालदाड व खांडगाव येथिल शेतकऱ्याचा सन्मान.
संगमनेर Live | हरित क्रांतीचे प्रणेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंती व कृषी दिनानिमित्त संगमनेर तालुक्यातील चार प्रगतशील शेतकर्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात करण्यात आला.
संगमनेर पंचायत समितीच्या सभागृहात स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित कृषी दिन निमित्त संगमनेर तालुक्यातील पांडुरंग बाळकृष्ण तळेकर, पंडित साहेबराव शिंदे, अनिल नवले, संदीप गुंजाळ या चार शेतकऱ्यांना प्रगतशील शेतकरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
यावेळी पंचायत समितीच्या सभापती सौ. सुनंदाताई जोर्वेकर, जिल्हापरिषद सभापती सौ. मिराताई शेटे, उपसभापती नवनाथ आरगडे, जिल्हापरिषद सदस्य अजय फटांगरे, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत रहाटळ, अशोक सातपुते, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, किरण अरगडे सर्व कृषी सहाय्यक उपस्थित होते.
कृषी दिनानिमित्त खंडेराय वाडी येथील पांडुरंग बाळकृष्ण तळेकर यांना कोरडवाहू शेती बद्दल, वाघापूर येथील पंडित साहेबराव शिंदे यांना फुलशेती बद्दल, मालदाड येथील अनिल विठ्ठल नवले यांना फळबागा बद्दल तर खांडगाव येथील संदीप शिवराम गुंजाळ यांना भाजीपाला मध्ये विशेष केलेल्या कामाबद्दल पुरस्कृत करण्यात आले.
यावेळी बोलताना सौ. सुनंदाताई जोर्वेकर म्हणाल्या की, महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील ग्रामीण विकास हा राज्याला दिशा दर्शक ठरलेला आहे. कमी पाण्यावर जास्त उत्पादन हे सूत्र अवलंबून तालुक्यात फळबागांची शेती वाढली आहे. संगमनेर तालुका हा तंबाटे आणि डाळिंब या पिकाचे आगार म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. आगामी काळात शेतकऱ्यांनी शेती व्यवसाय स्वरूप आणि करावी असे आवाहन त्यांनी केले
मिराताई शेट्टे म्हणाल्या की, शासनाच्या विविध सुविधा व योजना शेतकऱ्यांना मिळतील यासाठी सर्व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम करावे. याप्रसंगी जिल्हापरिषद सदस्य अजय फटांगरे, उपसभापती नवनाथ आरगडे यांनीही मनोगत व्यक्त केले
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी सुधाकर बोरुडे यांनी केले. सूत्रसंचालन तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे यांनी केले तर किरण अरगडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी कृषी विभागाचे सर्व अधिकारी कृषी सहाय्यक व कर्मचारी उपस्थित होते.