संगमनेर Live | नाग अथवा सापाचे दर्शन झाल्यास त्याला शुभं संकेत मानले जात असले तरी संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथिल विठ्ठल मंदिरात सायंकाळी नाग दिसल्याने उपस्थिताची चागलीच धावपळ झाली होती.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बुधवारी सायंकाळी आश्वी बुद्रुक येथिल विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविक येत-जात होते. यामध्ये महिला व पुरुषाचाही समावेश होता. यावेळी येथे आलेल्या पोळ गुरु याच्या नजरेस भितीच्या आडोशाला एक साप असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यानी प्रसंगसावधान बाळगत याबाबत तात्काळ आश्वी खुर्द येथिल संर्पमित्र शिवाप्रसाद याला फोन करुन येण्यास सागितले. यावेळी मंदिर परिसरात अनेकाचे येणे-जाने सुरु होते. अनेक महिला या मंदिराबाहेर उभ्या राहुन बोलत होत्या. मात्र नागरिकानमध्ये भिती निर्माण होऊन धावपळ होऊ नये यासाठी साप असल्याची कोणालाही कल्पना न देता पोळ गुरु हे संर्पमित्र येऊपर्यत सापावर लक्ष ठेवून होते.
माहिती मिळताचं संर्पमित्र शिवा पवार याने विठ्ठल मंदिराकडे धाव घेऊन साप पकडत असताना तो नाग असल्याचे लक्षात आले. ही माहिती उपस्थिताना कळताच त्याची चागलीच धावपळ उडाली. मात्र मोठ्या शिताफीने या विषारी नागाला संर्पमित्र शिवा पवार याने पकडल्यामुळे नागरीकानी सुटकेचा निश्वास सोडत संर्पमित्र शिवा पवार यांचे कौतुक केले आहे. दरम्यान पावसाळ्याचे दिवस असल्याने साप हे मोठ्या प्रमाणात नजरेस पडत असून याना मारण्याऐवजी नागरीकानी घाबरुन न जाता मला संपर्क करावा असे आवाहन संर्पमित्र शिवा पवार याने केले आहे.