कृषीदुत कुणाल भुसाळ याचे येथिल शेतकरी व ग्रामस्थाकडून स्वागत.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे श्रमशक्ती कृषी महावि्द्यालय, मालदाड येथील विद्यार्थी व कृषीदुत कुणाल संजय भुसाळ याने ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी आद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाला सुरुवात केली असून कृषीदुत कुणाल भुसाळ याचे येथिल शेतकरी व ग्रामस्थानी स्वागत केले.
यावेळी कृषीदूत कुणाल भुसाळ याने गावातील शेतकरी व ग्रामस्थांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला. करोनाचा प्रादुर्भाव व त्यासाठी लोकांमध्ये जागृती होण्यासंदर्भात चर्चा केली. या कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत शेतातील माती परीक्षण, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, बीज प्रक्रिया, शेतातील अवजारांचा वापर, शेतीचे व आर्थिक नियोजन, जनावरांचे लसीकरण, आधुनिक शेती, सेंद्रिय शेती, औषधे फवारणी आदी विषयांवर गावकऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे. तसेच विविध विषयांची प्रत्यक्षिके आयोजित करून आधुनिक तंत्राविषयी जनजागृती केली जाणार आहे.
या कार्यक्रमासाठी श्रमिक उद्योग समूहाचे अध्यक्ष तसेच सेवा संस्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव नवले, डॉ. अरविंद हारदे, डॉ. आशोक कडलग, प्रा. निलेश तायडे आणि सर्व विषय तज्ञांचे मार्गदर्शन लाभत असल्याचे कृषीदूत कुणाल भुसाळ यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान याप्रसंगी विखे पाटील साखर कारखान्याचे संचालक व माजी व्हा. चेअरमन रामभाऊ भुसाळ, सरपंच किरण भुसाळ, उपसरपंच नानासाहेब उंबरकर, ग्रामसेवक भाऊसाहेब मांढरे, सदस्य विजय शेळके, गणेश भुसाळ, निलेश निर्मळ आदि उपस्थित होते.