संगमनेर Live | पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात नुकताच आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. या योगा अभ्यासात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच कोव्हीड परिस्थितीमुळे सर्व विध्यार्थी, विध्यार्थीनी ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते.
सर्व विध्यार्थ्यांमध्ये सकाळपासूनच नवचैतन्य निर्माण झाल्याने, महाविद्यालयाचा परिसर योगमय झाला होता. कार्यक्रमासाठी प्रमुख प्रात्यक्षिक मार्गदर्शक म्हणून प्राचार्य डॉ. संजय भवर तसेच, ग्रंथपाल वाल्मिक तुरकणे यांनी विद्यार्थी व कर्मचा-यांना मार्गदर्शक करुन योगा विषयक माहीती दिली.
या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय भवर म्हणाले की, “योगा म्हणजे मनुष्याच्या शारीरिक, मानसिक व आध्यात्मीक विकासाची गुरुकिल्ली आहे, सर्वांनी नियमित योगसाधना करत या प्राचीन शास्त्राचे अगणीत फायदे शोधले पाहीजे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात योगशास्त्राने अविभाज्य स्थान मिळवल्यावरच समाजाचा सर्वांगीण विकास साध्य होईल असे सांगतानाच, योगसाधणेचे महत्व व विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर करून माहिती त्यांनी यावेळी दिली.