◻ तरुणासह जेष्ठ नागरीकानाही होणार फायदा ; मुली व महिलाना व्यायामासाठी स्वंतत्र व्यवस्था.
संगमनेर Live | कोरोनाचे जागतीक संकट तसेच धकाधकीच्या जीवनामुळे सर्वानीच आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे तरुणाबरोबरचं नागरीकानाही व्यायामाच्या चागल्या सुविधा आश्वी खुर्द येथे उभारण्यात आलेल्या सुसज्ज जिमच्या माध्यमातून उपलब्ध होणार असून उद्या सोमवार दि. १९ जुलै रोजी सकाळी ९ वा. रामेश्वर व उंब्रेश्वर देवस्थानचे मठाधिपती हभंप दत्तगिरी महाराज याच्या शुभहस्तें उध्दघाटन व लोकार्पण होणार असल्याची माहिती जिमचे प्रमुख व प्रशिक्षक शरद पवार यानी दिली आहे.
आश्वी खुर्द येथिल प्रवरा डाव्या कालव्यालगत स्वराज्य कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या मजल्यावर हवेशीर व शांत ठिकाण सुसज्ज ग्रोअप जिम उभारण्यात आली आहे. याठिकाणी व्यायामासाठी येणाऱ्याना उत्कृष्ट मार्गदर्शन, अत्याधुनिक साहित्य तसेच मुली व महिलाना व्यायामासाठी स्वंतत्र व्यवस्था करण्यात आली असून तरुणासह पंचक्रोशीतील नागरीकानी या जिमचा वापर आपल्या चागल्या आरोग्यासाठी करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान उद्या होणाऱ्या लोकार्पण व उध्दघाटन सोहळ्यासाठी कोविड - १९ नियमाचे पालण करत पंचक्रोशीतील नागरीकानी उपस्थित रहावे असे आवाहन श्रीमती सत्यभामा रावसाहेब पवार, महेश रा. पवार, शरद रा. पवार, प्रतिक संजय गायकवाड, आदिनाथ जाधव व पत्रकार तसेच माजी उपसरपंच संजय गायकवाड यानी केले आहे.