◻ आश्वी परिसरातील त्या सहा गावानमध्ये पुन्हा १४ बाधीत.
संगमनेर Live | नगर जिल्ह्यात मागील काही दिवसापासून कोरोना बाधीताची संख्या कमी होत असली तरी संगमनेर तालुक्यात मात्र कोरोना बाधीताची मंदावलेली गती आधून मधून वाढताना दिसत आहे. बुधवारी (७ जुलै २०२१) पुन्हा तालुक्यात ४१ बाधीत रुग्ण आढळून आले असून आश्वी परिसरातील सहा गावात पुन्हा बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. तर उंबरी बाळापूर व आश्वी बुद्रुक येथे रुग्ण वाढ हि चिता वाढवणारी आहे.
बुधवारी संगमनेर च्या शहरी भागात २, उंबरी बाळापूर येथे ४, आश्वी बुद्रुक येथे ५, पानोडी येथे २, कनोली येथे १, ओझर खुर्द येथे १, निमगावजाळी येथे १, अंभोरे येथे १, वरंवडी येथे १, खांजापूर येथे १, जाखोरी येथे १, साकूर येथे ३, मांडवे बुद्रुक येथे २, हिरेवाडी येथे १, मालदाड येथे १, घुलेवाडी येथे १, निळवडे येथे २, कौठै बुद्रुक येथे १, पिपळगाव माथा येथे ३, राजापूर येथे २, जवळे कडलग येथे १, कोकणगाव येथे १, शिदोंडी येथे १, निमोण येथे १ व पिपळे येथे १ असे एकून तालुक्यात ४१ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान आश्वी परिसरातील उंबरी बाळापूर, आश्वी बुद्रुक, पानोडी, कनोली, ओझर खुर्द व निमगावजाळी या गावामध्ये पुन्हा बाधीत १४ रुग्ण आढळल्यामुळे नागरीकानी सोशल डिस्टंसिगंचे पालन करताना मास्क घालने बंधनकारक असून नागरीकानी योग्य ती काळजी घेऊन स्वता:चे व कुटुंबाचे संरक्षण करावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.