◻ दाढ खुर्द शिवारातील घटनेने परिसरात खळबळ.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द शिवारात लक्ष्मण कृष्णाजी खेमनर (रा. खळी रोड, दत्त मंदिराजवळ चणेगाव, ता. संगमनेर) या जेष्ठ व्यक्तीला ७ हजार रुपयाला पोलीस असल्याची बतावणी करुन एका भामट्याने लुटल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ७ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास लक्ष्मण कृष्णाजी खेमनर हे दाढ खुर्द येथिल स्मशानभूमीलगतहून चालले होते. यावेळी त्याना अडवून एका अज्ञात व्यक्तीने पोलीस असल्याची बतावणी करत तपासणी करण्यासाठी त्याना खिशातील सर्व सामान बाहेर काढण्यास सांगितले. याप्रसंगी मोठ्या चालाकीने त्याने पाकीटातील ७ हजार रुपयाची रोख रक्कम काढून घेतली व खिशातील बाकी वस्तू रुमालात बाधून पिशवीत टाकल्या व तेथून निघून गेला.
यानतंर खेमनर यानी आपल्या सामानाची पाहणी केली असता आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले व त्यानी आश्वी पोलीस ठाणे येथे गुरंन १२३/२०२१ नुसार भादंवी कलम १७०, ४२० प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास आश्वी पोलीस करत आहे.