संगमनेर Live | उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेल्या अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या इलेक्ट्रिकल शाखेतील सुषमा भारत मुळे हिला पुणे विद्यापीठाचे दोन गोल्ड मेडल प्राप्त झाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ दरवर्षी अंतिम वर्षाच्या परीक्षांमध्ये संपूर्ण विद्यापीठातून प्रथम येणार्या विद्यार्थ्यास गोल्ड मेडल ने सन्मानित करते. या अनुषंगाने एप्रिल - मे २०१९ मध्ये इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षाच्या घेतलेल्या परीक्षांमध्ये अमृतवाहिनी च्या इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग शाखेतील सुषमा भारत मुळे हिने प्रथम येत २ गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. जी. एच. रायसोनी व कै. लासवासी रमाकांत (दादासाहेब) मनोहर एकबोटे अशा नावाने दिले जाणारे हे दोन्ही गोल्ड मेडल येणार्या पदवीदान समारंभात तिला सन्मानपूर्वक दिले जाणार आहेत असे परिपत्रक विद्यापीठाने घोषित केले.
अमृतवाहिनी महाविद्यालय गुणवत्तेच्या बाबतीत सर्वोत्कृष्ट ठरले आहे. अमृतवाहिनी मध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतल्या जाणार्या विविध उपक्रमांमुळे महाविद्यालयासही विविध मानांकन प्राप्त झाली आहेत. अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन तसेच महाविद्यालयाने राबवलेली टीचिंग लर्निंग प्रोसेस अमृत बुक डिस्ट्रीब्यूशन स्कीम, विविध सराव परीक्षांचे आयोजन, सॉफ्ट स्किल ट्रेनिंग, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी इंन्स्टीट्युशनल रिपॉजिटरी, स्वच्छ व प्रसन्न निसर्गरम्य परिसर इत्यादी बाबी महाविद्यालयाच्या सर्वोत्कृष्ट निकालासाठी जमेच्या ठरले आहेत.
दरम्यान सुषमा मुळे हिला २ गोल्ड मेडल मिळाल्याबद्दल महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे, इंद्रजीत थोरात, विश्वस्त सौ. शरयुताई देशमुख मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंद, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, उपप्राचार्य अशोक मिश्रा, रजिस्टर पी. व्ही. वाघे, इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख सुनील कडलग, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.