संगमनेर Live (लोणी) | अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनी देशाला आत्मनिर्भरतेने पुढे घेवून जाण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल असा विश्वास आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
प्रवरा उद्योग समुहाच्या वतीने कारखाना कार्यस्थळावर स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सवी ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला. आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून मानवंदना देण्यात आली. लोणी बुद्रूक ग्रामपंचायत, पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, लोणी पोलिस ठाणे आदि ठिकाणी आ. विखे पाटील यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम संपन्न झाले. भाजपाच्या वतीने मतदार संघात प्रत्येक बुथवर तिरंगा रॅलीचे आयोजन स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने करण्यात आले होते. भाजपाचे पदाधिकारी, शक्तीप्रमुख, बुथ कमिटी प्रमुख आणि कार्यकर्ते, ग्रामस्थ या रॅलीमध्ये उत्फूर्तपणे सहभागी झाले होते.
याप्रसंगी बोलताना आ. विखे पाटील म्हणाले की, स्वातंत्र्य मिळवून आज ७५ वर्षांचा टप्पा पुर्ण होत असला तरी, स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग आणि देशाप्रती आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांचे बलिदान आपल्याला कधीच विसरता येणार नाही. देशाने आजपर्यंत साध्य केलेल्या प्रगतीत प्रत्येक नागरीकाने केलेली भागिदारी अतिशय महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी आवर्जुन नमुद केले.
कोव्हीड संकटाच्या आव्हानात्मक परिस्थितीवर मात करुन, या देशाने पुन्हा घेतलेली उभारी नवी उर्जा देणारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सामान्य माणसांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांच मोठा लाभ झाला. कोव्हीड लसिकरणाची मोहीम देशात यशस्वीपणे सुरु आहे. सर्वाधिक लसीकरण करणारा देश म्हणून भारताची ओळख आता झाली असल्याचे स्पष्ट करुन, आ. विखे पाटील यांनी सागितले की, किसान सन्मान योजना, कृषि विधेयकामुळे शेतकऱ्यांना मिळालेले स्वातंत्र्य, ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना वैद्यकिय शिक्षणासाठी २७ टक्यांचे दिलेले आरक्षण या सर्व महत्वपूर्ण निर्णयामुळेच देशातील नागरीकांची सामाजिक सुरक्षितता आबाधित राखली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, कारखान्याचे व्हाईस चेअरमन विश्वासराव कडू, चेअरमन नंदू राठी, सिनेट सदस्य अनिल विखे, सरपंच कल्पना मैड, उपसरपंच गणेश विखे, रामभाऊ विखे, राहुल धावणे, दिलीपराव विखे, चेअरमन चांगदेव विखे, माजी सरपंच लक्ष्मण बनसोडे, माजी उपसरपंच अनिल विखे, नवनीत साबळे, भाऊसाहेब विखे, संतोष विखे, प्रविण विखे, सुभाष म्हस्के, संभाजी विखे, गोरक्ष दिवटे, कैलास विखे, सरोज साबळे, ग्रामविकास आधिकारी श्री. थिगळे आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रत्येक बुथवर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शिर्डी मतदार संघातील प्रत्येक बुथवर कार्यकर्त्यांनी तिरंगा रॅली आयोजित करुन, स्वातंत्र्य दिनाचा जयघोष केला. लोणी बुद्रूक येथील तिरंगा रॅलीत आ. राधाकृष्ण विखे पाटील, माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ सहभागी झाले होते.