◻ महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचा पर्दाफाश करण्याचे आ. विखे पाटील यांचे आवाहन.
संगमनेर Live (लोणी) | राज्य सरकारने कोव्हीडचे कारण सांगून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले, शेतकऱ्यांना कवडीची मदत न करणाऱ्या महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचा पर्दाफाश करा आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी कृषि क्षेत्राला बळकटी देण्यासाठी सुरु केलेल्या योजनांची माहीती देण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचा असे आवाहन भाजपा नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी किसान मार्चाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना केले.
भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाच्या वतीने उत्तर नगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा मोळावा आ. विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या मेळाव्यात नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. माजी आमदार बाळासाहेब मुरकूटे, उत्तर नगर जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र गोंदकर, किसान मोर्चाचे प्रभारी जालिंदर वाकचौरे, जिल्हा उपाध्यक्ष अँँड. रघुनाथ बोठे, अशोक पवार, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस नंदकुमार जेजूरकर, गणेश कारखान्याचे चेअरमन मुकूंदराव सदाफळ, सभापती भाऊसाहेब जेजूरकर, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, बाळासाहेब डांगे, युवा मोर्चाचे अध्यक्ष सतिष बावके उपसभापती ओमेश जपे, बाळासाहेब जपे, जि. प. सदस्या कविता लहारे, संगमनेर शहर अध्यक्ष अँँड. श्रीराम गणपूले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
आ. विखे पाटील यांनी केंद्र सरकारने शेतकरी हाच केंद्रीभूत मानून घेतलेल्या निर्णयांचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळाले. कोव्हीड संकटातही अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचा प्रयत्न झाल्यामुळेच देशाचा कृषि विकास दर ११ टक्कयांवर पोहचला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील कृषि क्षेत्रासाठी क्रांतीकारी पर्व सुरु झाल्याकडे लक्ष वेधून त्यांनी सांगितले की, किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून ११ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. आजपर्यत ८४ हजार कोटी रुपयांच्या योजना देशभरात शेतकऱ्यांसाठी सुरु झाल्यामुळेच कृषि क्षेत्राला नवी दिशा मिळत असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.
राज्य सरकार मात्र कोव्हीड संकटाच्या नावाखाली हात बांधून बसले आहे. केवळ लॉकडाऊनचे निर्णय करुन, या सरकारने जनतेला त्रस्त केले. कवडीचीही मदत हे सरकार करु शकले नाही. राज्यात लसिकरण झाले ते सुध्दा प्रधानमंत्र्यांनी मोफत लस उपलब्ध करुन दिल्यामुळेच, तुम्ही राज्यातील शेतकऱ्यांना काय दिले.? असा सवाल उपस्थित करुन, आ. विखे पाटील म्हणाले की, आघाडी सरकारच्या मंत्र्यांचा पर्दाफाश करण्याची जबाबदारी किसान मोर्चाला आता पार पाडावी लागणार आहे. आघाडी सरकारचे अपयश लोकांमध्ये जावून तुम्हाला सांगावे लागेल. एकीकडे तीन पक्षांचा आवाज आहे तर, दुसरीकडे भाजप म्हणून आपला आवाज लोकांमध्ये जावून मजबुत करावा लागेल. केंद्र सरकारच्या योजनांची माहीती शेतकऱ्यांच्या बांधावर जावून द्या. यासाठी किसान मोर्चाची संवाद यात्रा सुरु करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी किसान मोर्चाचे प्रभारी जालिंदर वाकचौरे यांनी आ. विखे पाटील यांनी मुंबई मध्ये भरविलेल्या अँँग्रो अँँडव्हाटेज प्रदर्शनाची आठवन करुन देत कृषि मंत्री म्हणून सुरु केलेल्या योजनांची माहीती त्यांनी दिली. जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी पक्षाच्या आघाड्यांमधुन केंद्र सरकारच्या कामाची माहीती लोकापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. किसान मोर्चाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सतिष कानवडे यांनी प्रास्ताविक केले.