◻ लोणी बुद्रूक येथे नव्याने बांधण्यात आलेल्या तलाठी कार्यालयाचे आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे हस्तें उध्दघाटन.
संगमनेर Live (लोणी) | शासकीय योजनांसाठी आवश्यक असणारे दाखले मिळण्यासाठी नवीन तलाठी कार्यालयाचा निश्चितच उपयोग होईल. या माध्यमातून महसूल प्रशासनानेही गतीमानतेने नागरीकांना सुविधा द्यावी असे आवाहन माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
लोणी बुद्रूक येथे नव्याने बांधण्यात आलेल्या तलाठी कार्यालयाचे उद्घाटन आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आणि माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले. प्रांताधिकारी गोविंद शिंदे, नायब तहसिलदार भाऊराव भांगरे, सोसायटीचे चेअरमन सीएम विखे, चेअरमन नंदू राठी, सरपंच कल्पना मैड, उपसरपंच गणेश विखे, रामभाऊ विखे, दिलीपराव विखे, चेअरमन चांगदेव विखे, माजी सरपंच लक्ष्मण बनसोडे, माजी उपसरपंच अनिल विखे, लक्ष्मण विखे, चंद्रकांत म्हस्के, गणेश विखे, संतोष विखे, प्रविण विखे, सौ. सिंधुताई म्हस्के, सौ. सुरेखा चव्हाण, संभाजी विखे, गोरक्ष दिवटे, कैलास विखे, सरोज साबळे, मंडल अधिकारी अनिल मांढरे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
याप्रसंगी आ. विखे पाटील यांनी आधिकारी व ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधून महसुल प्रशासनात येत असलेल्या अडचणींबाबत चर्चा केली. आधिकाऱ्यांनाही प्रलंबित प्रकरणांबाबत तातडीने निर्णय करण्याबाबत त्यांनी सुचना केल्या. सर्वच शासकीय योजनांना शासकीय दाखल्यांची गरज ही अधिक असते. दाखले मिळविण्यासाठी होणारा विलंब टाळण्यासाठी या कार्यालयाने तत्पर सेवा द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान महसूल विभागाच्या वतीने प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी आ. विखे पाटील यांचे स्वागत केले. नव्या तलाठी कार्यालयाच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.