संगमनेर Live | काँग्रेस गोरगरीब व सर्वसामान्यांच्या विकासासाठी सतत काम करणारा पक्ष आहे. या पक्षाची विचारधारा ही लोकशाहीला समर्पित आहे. काँग्रेसमध्ये तरुणांना भविष्यात मोठी संधी असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केली असून आज शेवगाव तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथिगृहावर राज्याचे महसूल मंत्री व काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते नामदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश बापू भोसले मुंगी गावचे उपसरपंच भय्यासाहेब दसपुते, शेख अहमद, नितीन घोरपडे, दिगंबर बल्लाळ, इम्रान शेख, संदीप सोनवणे आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी कॉग्रेस पक्षात प्रवेश केला.
याप्रसंगी अनुसूचित जाती - जमाती सेलच्या जिल्हा उपाध्यक्षपदी रविंद्र ब्राह्मणे यांची तर नगर तालुका अध्यक्ष पदी विजय पात्रे यांची निवड करण्यात आली
यावेळी बोलताना नामदार थोरात म्हणाले की, काँग्रेसला त्यागाची व बलिदानाची मोठी परंपरा आहे. अहमदनगर जिल्हा काँग्रेसचा कायम बालेकिल्ला राहिला आहे. आगामी काळामध्ये या पक्षामध्ये तरुणांना मोठी संधी आहे. भाजपने फक्त भूलथापा दिले आहेत. भाजपाकडून लोकांचा पूर्ण भ्रमनिरास झाला आहे. काँग्रेसची विचारधारा ही सर्वसमावेशक व सर्वधर्म समभावाची आहे. या पुढील काळात सर्वानी पक्षबांधणीसाठी अधिक जोमाने काम करावे असे आवाहन ना. थोरात यानी केले आहे.