ती.? सात गावे आश्‍वी पोलिस स्‍टेशनला पुन्हा जोडण्‍यासाठी पोलिस अधिक्षकांना निवेदन.

संगमनेर Live
0
संगमनेर Live | आश्‍वी पोलिस ठाण्‍याच्‍या अंतर्गत येणारी सात गावे संगमनेर तालुका पोलिस स्‍टेशनला जोडण्‍याचा अन्‍यायकारक निर्णय तातडीने मागे घ्‍यावा अन्‍यथा प्रशासनाच्‍या विरोधात तिव्र आंदोलन करण्‍याच इशारा शिष्‍टमंडळाने पोलिस अधिक्षकांना दिला आहे.

आश्‍वी पोलिस ठाण्‍याच्‍या हद्दीमध्‍ये येत असलेली रहीमपूर, ओझर खुर्द, ओझर बुद्रूक, मनोली, कनकापूर, हंगेवाडी, कनोली ही गावे संगमनेर तालुका पोलिस ठाण्‍यास जोडण्‍याचा आदेश महाराष्‍ट्र शासनाने काढला. या निर्णयामुळे या सातही गावातील ग्रामस्‍थांमध्‍ये अस्‍वस्‍थता निर्माण झाली. वास्‍तविक यापूर्वी या गावांमधील ग्रामस्‍थांना तालुका पोलिस स्‍टेशन दुर पडत असल्‍याने आश्‍वी येथे स्‍वतंत्र पोलिस ठाणे निर्माण करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला होता. मात्र अचानकपणे ही सात गावे आता तालुका पोलिस ठाण्‍यास जोडण्‍याचा आदेश निघाल्‍याने आश्‍चर्य व्‍यक्‍त केले जात आहे.

आश्‍वी येथे सध्‍या कार्यरत असलेले पोलिस स्‍टेशन हे सर्वच गावांना मध्‍यवर्ती असून, हे अंतरही पाच किलोमिटर पेक्षा जास्‍त नाही. परंतू आता ही गावे तालुका पोलिस ठाण्‍याच्‍या हद्दीत समाविष्‍ठ झाल्‍यास या सातही गावांना घुलेवाडी येथे असलेले तालुका पोलिस स्‍टेशनही हे २५ किलोमिटर अंतरावर पडेल. त्‍यामुळे कोणतीही घटना घडल्‍यानंतर तक्रारदाराला तसेच पोलिस प्रशासनालाही घटनास्‍थळी पोहोचण्‍यास मोठा विलंब होईल. ही वस्‍तुस्‍थ‍िती सात गावांमधील ग्रामस्‍थांच्‍या शिष्‍टमंडळाने जिल्‍हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांच्‍या निदर्शनास आणून दिली आहे.

भौ‍गोलिक, सामाजिक व प्रशासकीयदृष्‍ट्या शासनाचा नवीन आदेश हा या सातही गावांकरीता अतिशय गैरसोईचा ठरणार असून, ग्रामस्‍थांवरही अन्‍याय करणारा आहे. वास्‍तविक ही गावे तालुका पोलिस ठाण्‍यास जोडण्‍याबाबतचा कोणताही ठराव ग्रामपंचायतींनी केलेला नाही किंवा ग्रामस्‍थांची तशी मागणीही नाही परंतू हा निर्णय या गावांवर लादला गेल्‍यास मोठा असंतोष निर्माण होईल. या शासन निर्णयाच्‍या विरोधात ति‍व्र आंदोलन करण्‍याचा इशारा या शिष्‍टमंडळाने पोलिस अधिक्षकांना दिलेल्‍या निवेदनात दिला आहे.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !