◻ भुशाच्या पोत्याअडून गांजाची तस्कंरी ; दोन आरोपी ताब्यात.
संगमनेर Live (लोणी) | संगमनेर लोणी मार्गावर चंद्रपूर शिवारात लोणी पोलीसांनी शुक्रवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना पिकअप व्हॅन सह ७५ लाख रुपये किमतीचा ५१० किलो गांजा पकडला असून दोन आरोपींना गजाआड केले आहे.
शुक्रवारी पहाटे राहाता तालुक्यातील लोणी पोलीस ठाणे हद्दीतील लोणी संगमनेर मार्गावर चंद्रपूर शिवारात पेट्रोलिंग करत असतांंना लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील, पो. ना. दिपक रोकडे, कैलास भिंगारदिवे यांना एक महिंद्रा कंपनीची पिकअप गाडी (एम.एच. २५ पी. १२९४) ही संशयास्पद गाडी रस्त्याने जात असल्यामुळे गाडी चालकास पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र सदर गाडी चालक यांनी गाडी न थांबवता पुढे जात असल्याने सदर गाडीचा पाठलाग करून पोलिसांनी थांबविली. यावेळी त्यांना विचारपूस केली असता त्यांनी दिलेले उत्तर समाधानकारक न वाटल्याने पोलिसांचा संशय बळावला.
त्यामुळे पोलिसांनी गाडीची कसून झडती घेतली असता त्यात गांजा असलेल्या पांढऱ्या रंगाच्या गोण्या या नारळाच्या भूष्याने भरलेल्या गोणीच्या खाली लपवलेल्या पोलीसाना आढळून आल्या. त्यातील गांजाची गोणी काढून तपासणी केली असता त्याचा उग्र वास व त्याच्या रंगावरून पोलीसांना खात्री झाल्याने सदर वाहनाचा सरकारी पंचनामा तालुका दंडाधिकारी राहाता, राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये, तसेच वजन काटा धारक यांच्या समक्ष गाडीतील ५१० किलो ७५ लाख रुपये किमतीचा गांजा व ५ लाख रुपये किंमतीची महिंद्रा पिकप असा एकूण ८० लाख १ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान यावेळी त्या वाहनातील राहुल बाबासाहेब पवार वय - ३२ व दत्ता मारुती चव्हाण वय - ३५ (दोघे रा. जामखेड, जि. अहमदनगर) याना ताब्यात घेतले आहे. यावेळी या कारवाईत जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, शिर्डी कार्यालयाचे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांच्यासह सहाय्यक फौजदार बाबासाहेब लबडे, संपत जायभाये, कैलास भिंगारदिवे, संभाजी कुडाळकर, मनोज सणांनसे, संतोष लांडे, सोमनाथ वढणे, बाबासाहेब सांगळेेेे, पी. एन. इंगळे, पी. एन. शिंदे आदींनी सहभाग घेतला असून सदरचा कारवाईमुळे लोणी पोलिसांचेे सर्व स्तरातून कौतुक होत आहे