◻ आश्वी पोलीस स्टेशन हद्दीतील ९ गावे संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला जोडल्याने नागरीकानमध्ये गोधंळ.
संगमनेर Live | शिर्डी मतदार संघातील व संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस स्टेशन हद्दीतील ९ गावे तोडून ती संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला जोडली गेली आहेत. त्यामुळे पोलीस स्टेशन आमच्या बादांला असताना तक्रांर देण्यासाठी आम्ही २० ते २५ किलोमीटर अतंरावर का जायचे असा सवाल नागरीकाकडून विचारला जात असून लवकरचं या ९ गावातील ग्रामस्थांचे शिष्टमंडळ पोलीस अधिक्षक अहमदनगर यांची भेट घेऊन ही ९ गावे आश्वी पोलीस स्टेशन हद्दीत पुन्हा समाविष्ट करावी यासाठी निवेदन देणार असल्याची चर्चा आहे.
९ ऑक्टोबर २०१३ रोजी आश्वी पोलीस ठाण्याचे लोकार्पण तत्कालीन दिवगंत गृहमंत्री आर. आर. पाटील यानी केले होते. ९० हजार लोकसंख्येसाठी या ठाण्यात ५८ कर्मचाऱ्याना मजुंरी मिळाली होती. आश्वीसह पंचक्रोशीतील गावात शांतता, कायदा, सुव्यवस्था आबादीत रहावी व गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा यासाठी माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यानी आश्वी पोलीस ठाणे होण्यासाठी पाठपुरावा करत महत्त्वाची भुमिका बजावली होती. पोलीस स्टेशन झाल्यानतंर मागील ७ ते ८ वर्षात गुन्हेगारीला जरबं बसल्यामुळे परिसरातील गावानमध्ये छुट - पुट घटना वगळता शांतता, कायदा, सुव्यवस्था आजतागायत आबादीत आहे.
परतूं गुरुवारी दुपारनतंर आश्वी पोलीस स्टेशन हद्दीतील ओझर बुद्रुक, ओझर खुर्द, रहिमपूर, कणकापूर, कोंची, मांची, कनोली, मनोली व हंगेवाडी ही गावे संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला जोडली गेल्याची माहिती समोर आल्याने नागरीकाचा गोधंळ उडाला आहे. या गावाचे आश्वी पोलीस स्टेशन पासून अतंर केवळ ५ ते १२ किलोमीटरच्या दरम्यान असताना २० ते २५ किलोमीटर अतंरावरील तालुका पोलीस ठाण्यास ही गावे का जोडली गेली.? याचा उलगडा मात्र झालेला नाही. कारण हाकेच्या अतंरावर आश्वी पोलीस स्टेशन असल्याने संपर्काच्या दृष्टीने सोयीचे असल्यामुळे नागरीकाना मोठा दिलासा होता. सामाजिक, भौगोलिक व प्रशासकीयदृष्टया महत्वाची गावे अचानकपणे तालुका पोलीस ठाण्याला जोडली गेली. त्यामुळे उद्भवणारी परिस्थिती व होणाऱ्या त्रासामुळे नागरीकानी रोष व्यक्त केला आहे.
दरम्यान लवकरचं या ९ गावातील ग्रामस्थांचे शिष्टमंडळ पोलीस अधिक्षक अहमदनगर यांची भेट घेऊन ही ९ गावे आश्वी पोलीस स्टेशन हद्दीत पुन्हा समाविष्ट करावी यासाठी निवेदन देणार असल्याची चर्चा आश्वी सह पंचक्रोशीतील गावानमध्ये सुरु झाली आहे.
ना. थोरात याचां आ. विखे पाटील याना प्रशासकीय शह.?
ना. बाळासाहेब थोरात व आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात मागील अनेक वर्षापासून राजकीय संत्तासंघर्ष सुरु आहे. आ. विखे पाटील याच्या शिर्डी मतदार संघातील परंतु संगमनेर तालुक्यात येत असलेल्या व आता समाविष्ट करण्यात आलेल्या बहुताशं गावावर ना. बाळासाहेब थोरात यांचा वरचष्मा असून जोर्वे जिल्हापरिषद गटाला ही गावे जोडलेली आहेत. त्यामुळे ना. थोरात यानी ही ९ गावे तालुका पोलीस स्टेशनला जोडून आ. विखे पाटील याना प्रशासकीय शह दिला असल्याची चर्चा सुरु असून या कट - शहा च्या राजकारणात या घटनेमुळे ना. थोरात व आ. विखे यांचा सत्तासंघर्ष आणखी तीव्रं होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.