संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द शिवारातील नेमबाई माळ परिसरातील शेतात गुरुवारी मृत बिबट्या आढळल्याने खळबळ उडाली असून या मृत बिबट्याला वनविभागाच्या कर्मचाऱ्यानी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, ओझर खुर्द शिवारातील नेमबाई माळ परिसरात डाळीबं पिकाला औषध फवारणी करण्यासाठी चाललेल्या मंजूराना येथील शेतकरी शंकर आनंदा शिदें याच्यां गट नंबर ७३ मध्ये गुरुवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास एक बिबट्या निपचित पडलेला दिसला. त्यामुळे या मजूंराची भितीने गाळण झाली. परंतू बराच वेळ होऊनही हालचाल होत नसल्याने धाडस करत थोडे जवळ पाहीले असता बिबट्या मृत असल्याचे लक्षात आले. शेतकरी शंकर शिदें याना माहिती मिळताच त्यानी वनविभागाला याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच घटनेचे गाभिर्य ओळखून वनविभागाच्या कर्मचाऱ्यानी घटनास्थळी धाव घेऊन मृत बिबट्याला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान हा मृत बिबट्या हा अंदाजे दीड ते दोन वर्ष वयाचा मादी बिबट्या असून दोन बिबट्याच्या भांडणात या बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर या मृत बिबट्यावर निबांळे येथिल नर्सरीत अत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.