◻ उंबरी बाळापूर, आश्वी बुद्रुक, निमगावजाळी, प्रतापपूर, झरेकाठी आदि ८ गावानमध्ये ११ बाधीत.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यात सोमवारी (दि. २३ ऑगस्ट २०२१) ९१ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले असून आश्वी परिसरातील ८ गावानमध्ये पुन्हा ११ बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस वाढणाऱ्या संसर्गामुळे बाधीताची संख्या वाढत असल्याने नागरीकानी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
सोमवारी संगमनेरच्या शहरी भागात ३, उंबरी बाळापूर येथे १, आश्वी बुद्रुक येथे १, ओझर बुद्रुक येथे १, प्रतापपूर येथे १, झरेकाठी येथे १, निमगावजाळी येथे १, मनोली येथे २, खळी येथे २, वरंवडी येथे १, दरेवाडी येथे ४, खरशिंदे येथे ३, वनकुटे येथे ३, पारेगाव खुर्द येथे १, वेल्हाळे येथे १, धादंरफळ बुद्रुक येथे १, पळसखेडे येथे १, निमोण येथे १, चंदनापूरी येथे १, वडगाव लाडंगा येथे १, चिखली येथे ५, बिरेवाडी येथे ६,
तळेगाव दिघे येथे ३, हिवरगाव पठार येथे ३, बोटा येथे ७, गुंजाळवाडी येथे ३, घारगाव येथे ४, यळकोप येथे १, माळेगाव हवेली येथे १, पिपळगाव कोझिंरा येथे १, पिपंळे येथे १, खांडगाव येथे १, नादूंर येथे २, कासार दुमला येथे १, कणसेवाडी येथे १, कुरकुटवाडी येथे १, माडंवे बुद्रुक येथे ३, अकलापूर येथे १ व पिपळगाव देपा येथे १ असे कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान आश्वी परिसरातील उंबरी बाळापूर, आश्वी बुद्रुक, प्रतापपूर, झरेकाठी आदि ८ गावामध्ये बाधीत ११ रुग्ण आढळल्यामुळे नागरीकानी सोशल डिस्टंसिगंचे पालन करताना मास्क घालने बंधनकारक असून नागरीकानी योग्य ती काळजी घेऊन स्वता:चे व कुटुंबाचे संरक्षण करावे असे आवाहन करण्यात आले आहे.