संगमनेर Live | सहकार चळचळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२१ व्या जयंती दिनानिमित्त प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथिल कला, वाणिज्य, विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालय तसेच कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन येथे पद्मश्रींना अभिवादन करत जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शेतकरी दिनाचे औचित्य साधून औषधी वनस्पतीचे वाटप करण्यात आले.
यावेळी पद्मश्री डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब मांढरे अध्यक्षस्थानी होते. कारखाण्याचे विद्यमान संचालक डॉ. दिनकर गायकवाड, प्रवरा सहकारी बँकेचे माजी संचालक बाळासाहेब भवर, पंचायत समिती सदस्य निवृत्ती सांगळे, भाजपचे प्रशांत कोंडोलिकर, सरपंच म्हाळू गायकवाड, उपसरपंच सुनील मांढरे, पत्रकार संजय गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते संतोष भडकवाड आदीसह शेतकरी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवंरासह शेतकऱ्यानी पद्मश्री डॉ. विखे पाटील याना अभिवादन करत त्याचा जीवनपट उलगडला आहे.
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. ए. पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. आर. पाचोरे व पी. एन. खळदकर यांनी केले. प्रा. ए. आर. घोलप यांनी आपल्या मनोगतातून पद्मश्री डॉ. विखे पाटील यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.
यावेळी या कार्यक्रमाचे आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डी. डी. दाभाडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालायीन प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.