संगमनेर Live | अश्विनी पंतसस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला, पुरुष, तरुण उद्योजक, व्यावसायिक तसेच शेतकरी यांंना कर्ज पुरवठा होत असल्याने स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मोठी मदत मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थकारणाला खऱ्या अर्थाने गती देण्याचे अश्विनी पंतसस्थेचे काम हे कौतुकास्पद असल्याचे गौरोउद्गार आश्वीचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांनी काढले आहे.
संगमनेर तालुक्यात अग्रगण्य असलेल्या अश्विनी पंतस्थेच्या आश्वी येथिल मुख्य कार्यालयात पोलीस निरीक्षक सुभाष भोये याच्या संत्कार संभारभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संत्काराला उत्तर देताना पो. नि. भोये बोलत होते. याप्रसंगी महिला व पुरुष बचत गटातील सदस्यांने कर्जाचे वाटप करण्यात आले असून भाजप किसान मोर्चाच्या जिल्हा सचिवपदी भारत गिते याची निवड झाल्याबद्दल संत्कार करण्यात आला आहे.
दरम्यान या कार्यक्रमासाठी संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक बाळासाहेब भवर, पंचायत समिती सदस्य गुलाबराव सांगळे, माजी जिल्हापरिषद सदंस्य आर. डी. कदम, संस्थेचे चेअरमन मेजर संपतराव सांगळे, भाऊसाहेब लावरे, भाऊसाहेब मुंढे, संजय गांधी, सिताराम गिते, रघुनाथ जाधव, पत्रकार संजय गायकवाड, डॉ. बालोटे, रावसाहेब गिते, अँड. कोकजे, जनरल मॅनेजर डहाळे, मॅनेजर आंधळे आदिसह सर्व संचालक, कर्मचारी व बचत गटाच्या महीला उपस्थित होत्या.