◻ मनोली येथे साश्रू नयनानी निरोप ; स्थानिक पोलिस व सीआरपीएफ दलाच्या जवानाकडून मानवदंना.
संगमनेर Live | तब्बल दोन महिने मृत्यूशी झुंज दिल्यानंतर मृत्यू झालेले संगमनेर तालुक्यातील मनोली येथिल सीआरपीएफचे जवान किशोर सुखदेव गडाख यांच्यावर आज शुक्रवारी हजारोंच्या साक्षीनं शोकाकूल वातावरणात मनोली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी स्थानिक पोलिस व सीआरपीएफ दलाच्या जवानानी गडाख याना मानवंदना देत अभिवादन केले तर उपस्थित नागरीकानी साश्रू नयनांनी फुलाचा वर्षाव करत त्यांना अखेरचा निरोप दिला.
सीआरपीएफ जवान किशोर गडाख हे मागील १७ वर्षापासून भारतीय सैन्यदलात कार्यरत होते. मागील दोन महिन्यापूर्वी त्याना त्रास होत असल्याने दिल्ली येथिल सैन्य रुग्णालयात ते उपचार घेत होते. अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गडाख हे मुळचे वाबोंरी (ता. राहुरी) येथील असले तरी मागील अनेक वर्षापुर्वी मनोली येथे कुटुंबियासमवेत स्थानिक झाले होते. त्यामुळे त्याचे पार्थिव शरीर मनोली येथे आणण्यात आले होते.
मनोली येथिल अमरधाममध्ये किशोर गडाख याचे पार्थिव शरीर ठेवल्यानतंर स्थानिक पोलिस व सीआरपीएफ दलाच्या जवानानी हवेत बंदुकीच्या फैरी झाडत त्याना मानवंदना दिली. यावेळी तहसीलदार अमोल निकम, जिल्ह्यातून आलेले माजी सैनिक, महसूलचे अधिकारी व कर्मचारी तसेच पंचक्रोशीतून आलेल्या मान्यंवरानी अभिवादन केले. दरम्यान यावेळी किशोर गडाख यांचा ८ वर्षाचा मुलगा अक्षय याने मुखाग्नी दिला आहे. यावेळी उपस्थित नागरीकानी साश्रू नयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.
दरम्यान जवान गडाख याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई असा परिवार असून मनोली येथिल बाळासाहेब रावसाहेब भवर याचे साडू सुखदेव याचांं किशोर गडाख हे चिरंजीव होते.