◻ विडीयो सोशल माध्यमात वायरल..
संगमनेर Live | प्रसिद्ध क्रांतीकारी कीर्तनकार तथा वारकरी संप्रदायाचे प्रचारक व प्रसारक हभप ताजुद्दीन शेख महाराज (वय - ५७) यांचे सोमवारी रात्री कीर्तन सेवा देतानाच निधन झाल्याचे धक्कादायक वृत्त हाती आले आहे.
कीर्तनकार हभप शेख महाराज यांचे सोमवारी (ता. २७ सप्टेंबर) रात्री साडेनऊ-दहाच्या सुमारास माळमाथा परिसरातील जामदे (ता. साक्री) येथे ज्ञानेश्वरी पारायण व किर्तन सप्ताहादरम्यान किर्तनसेवा देत होते. यावेळी त्याना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ते खाली कोसळले. यानतंर त्यांना जामदेहून प्रथमोपचारासाठी तातडीने शनिमांडळ व नंदुरबार येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते.
परंतु दरम्यानच्या काळात त्यांची प्राणज्योत मालवल्यामुळे त्यानी देह ठेवला. त्यामुळे नंदुरबारहुन त्यांचे पार्थिव शरीर औरंगाबाद जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील त्यांच्या मुळ गावी हलविण्यात आल्याची माहिती समजली आहे.
दरम्यान शेख महाराज हे मुस्लिम असले तरी त्याचे मराठी व हिंदी या भाषांसह संस्कृतवर प्रभुत्व होते व वारकरी सप्रंदयाचे गाढे अभ्यासक होते. दोन वर्षापूर्वी शेख महाराज एका कीर्तन सेवेत म्हणाले होते की, “ मला कीर्तन करताना मरण आले, तर माझ्या सारखा भाग्यवान मीच असेल ” हा विलक्षण योगायोग महाराजांच्या जीवनात घडून आल्याने वारकरी बाधंव शोकसागरात बुडाला आहे.