◻ आश्वी खुर्द येथून सेवा सोसायटीच्या सदंस्यानी नोदंवला ऑनलाइन सहभाग.
संगमनेर Live | देशातील सहकार मजबूत करणं हे आपलं ध्येय आहे, गरिबांचं कल्याण आणि शेवटच्या घटकापर्यंत विकास हे सहकाराशिवाय शक्य नाही. गावांना समृद्ध करणं हे सहकारामुळे शक्य आहे. सह आणि कार्य म्हणजे सहकार आहे. एकदिशेने काम केल्यास गरिबांचं कल्याण शक्य आहे. सहकारामध्ये प्रचंड ताकद असून सहकारातून समृद्धी हा पंतप्रधान मोदींनी दिलेला नारा आहे. त्यामुळे ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था गाठणे हे स्वंप्न सहकारातूनचं शक्य होणार असल्याचे प्रतिपादन केद्रिंय सहकार मंत्री अमित शाह यानी केले आहे.
केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या नेतृत्त्वात देशातील पहिले सहकार संमेलन राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आले होते.
यामध्ये ऑनलाईन पद्धतीने देशभरासह संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथून सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन विठ्ठल गायकवाड, सरपंच म्हाळू गायकवाड, मकरंद गुणे, बाळासाहेब जगन्नाथ गायकवाड, आप्पासाहेब भिमाजी गायकवाड, भास्कर बर्डे, विक्रम गायकवाड, कैलास गायकवाड, दत्ता गायकवाड, मोहित गायकवाड, सुरेश मांढरे, दिलीप मांढरे, इंद्रभान गागरे, रमेश सिनारे व इफको चे आधिकारी ऑनलाइन पध्दतीने सहभागी झाले होते.
यावेळी महाराष्ट्रातील सहकार आंदोलनाला बळ देणारे माधवराव गोडबोले, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, यशवंतराव चव्हाण, धनंजय गाडगीळ, लक्ष्मणरावर इमानदार यांच्या कार्याचा गौरव मंत्री शहा यानी केला. तसेच मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना जे जमलं नाही ते अमूलने करुन दाखवल्याचे ही अमित शाह यावेळी म्हणाले आहेत.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा पहिला सहकार मंत्री म्हणून निवड केल्याबद्दल अमित शाह यानी पंतप्रधान याचे आभार मानले आहेत. तर या समेंलनाचे स्वागतपर भाषण इफकोचे अध्यक्ष बलविंदर सिंग नकई यानी केले आहे.