◻ सकाळी गावरान तुप, दूधाबरोबरचं तो पंधरा किलो सफरचंदही खायचा.
संगमनेर Live | भारतातील पशुप्रेमीच्या आकर्षणाचे केद्रंबीदू असलेल्या रेड्याचा म्हणजे सुलतानचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असून मालक नरेश यांच्या सह अनेक प्राणीप्रेमींना देखील दु:ख झालं आहे.
हरयाणातील कैथल जिल्ह्यातील हा रेडा 'नवाबी' आयुष्य जगला. अलीकडेच काही दिवसांपूर्वी त्याचे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले असून सुलतानच्या वीर्यापासून लाखो रुपये कमावण्यात आले होते. तो एका वर्षात ३० हजार सीमेन डोस देत असे. ज्यातून आतापर्यंत लाखो रुपये मिळत होते.
राजस्थानातील पुष्कर जत्रेत एका व्यक्तीने सुलतानवर २१ कोटी रुपयांची बोली लावली होती. पण नरेश यानी विकण्यास नकार दिला होता. सुलतानला लहानाचे मोठे केले असल्यामुळे त्यांच्या मृत्यूनतंर नरेश कुटुंबियात दु:खाचं वातावरण आहे.
नरेश बेनीवाल यांनी सांगितले की, सुलतान सकाळच्या न्याहारीत देशी तुप आणि दूध प्यायचा. तो पंधरा किलो सफरचंदही खात असे. प्राण्याच्या मेळाव्यात सुलतानचा दबदबा असायचा. त्याच्यामुळे नरेश यांच्या कुटुंबीयांना विशेष प्रसिद्धी मिळाली होती. दरम्यान नरेश यांच्या मते, सुलतानची कमतरता कोणीही भरुन काढू शकत नसले तरी, पण आपण त्याच्यासारखंच संगोपन इतर रेड्यांचं करणार असल्याचे एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे.