◻ कोव्हीड सेंटरमध्ये सर्व आरोग्य सुविधांची अद्यावत उभारणी.
संगमनेर Live (लोणी) | कोव्हीड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून प्रवरा कोव्हीड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा सुरू झालेले जिल्हयातील पहीलेच केव्हीड केअर सेंटर आहे.
कोव्हीडच्या तिसऱ्या लाटेत पुन्हा रुग्ण संख्या वाढत आहे. गावपातळीवर तातडीने उपचार मिळण्यात अडचण निर्माण होवू नये म्हणून माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने प्रवरा कोव्हीड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा कोव्हीड सेंटरमध्ये सर्व आरोग्य सुविधांची अद्यावत उभारणी करण्यात आली आहे.
कोव्हीडच्या दुसऱ्या लाटेत वाढती रुग्णसंख्या आणि उपचार मिळण्यासाठी रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची झालेली धावपळ लक्षात घेवून आ. विखे पाटील यांनी लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात पाचशे बेडचे कोव्हीड रुग्णालय सुरू केले होते. यामध्ये ऑक्सिजन बेडसह मोफत औषध आणि चहा, नाष्टा आणि जेवणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती. या कोव्हीड केअर सेंटरमुळे आठशेहून अधिक रुग्ण यशस्वी उपचार घेवून बरे झाले होते. लाखो रुपयांचा खर्चही वाचला होता.
दरम्यान कोव्हीडच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेवून हे कोव्हीड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्यात आल्याने शिर्डी मतदारसंघासह शेजारील अन्य गावातील नागरीकंना सुविधांचा लाभ मिळेल आशी व्यवस्था करण्यात आली आहे.