संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक बाजारपेठेत चक्कर ऐऊन पडल्याने आवड्या श्रावण जाधव (वय - २५, जि. नाशिक) या तरुणाचा रुग्णालयात उपचारापुर्वीचं मृत्यू झाला आहे.
याबबत समजलेली अशी की, शुक्रवारी (२२ ऑक्टोबर) रोजी आश्वी बुद्रुक येथिल बाजारपेठ आवड्या श्रावण जाधव (रा. असवली, ता. इगतपुरी, जि. नाशिक) हा काही कामानिमित्त आला होता. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्याला चक्कर आल्याने तो खाली कोसळला.
त्यामुळे तेथे उभ्या असलेल्या स्थानिक ग्रामस्थानी धाव घेत चौकशी केली. यावेळी बबन खेमनर यानी तात्काळ ग्रामस्थांच्या मदतीने जाधव याला घुलेवाडी येथिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचापुर्वीचं त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरानी सांगितले.
दरम्यान विलास शिवाजी सोनवणे यानी दिलेल्या खबरीवरुन आश्वी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोदं करण्यात आली असून पोलिस निरिक्षक सुभाष भोये याच्यां मार्गदर्शनाखाली हवालदार आर. डी. पारथी हे पुढील तपास करत आहेत.