◻ शेडगाव येथिल घटना ; रुढी-परंपरेला छेद देत मुलीनी केले अंत्यसंस्कार.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथे रूढी परंपरांना मोडीत काढणारी अंत्ययात्रा पाहायला मिळाली असून मुलगा नसल्याने आपल्या दिवगंत पित्याला तीन मुलींनीच खांदा देत त्याचे पार्थिव शरीर स्मशानभूमीत नेल्यानंतर जन्मदात्याला या मुलीनी मुखाग्नि दिल्याची मन सुन्न करणारी घटना घडली आहे.
सुखदेव गोविंद घुगे (वय - ६५) यांचे नुकतेचं अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांच्या पाश्चात पत्नी, तीन मुली, जावई, नातवंडे व तीन भाऊ असा परिवार आहे. सुखदेव घुगे याना मुलगा नव्हता त्यामुळे त्यांच्या पार्थिवास भावकीतील व्यक्ती व जावई खांदा देण्यासाठी पुढे आले होते. परंतु संपूर्ण आयुष्य भर मायेची उब देणाऱ्या जन्मदात्या पित्याचे ऋण फेडणे शक्य नाही. मात्र त्याच्या अंतिम प्रवासात त्याच्या पार्थिव देहाला खांदा देऊन वडीलाचे पांग फेडण्याचे या तिन्ही मुलीनी ठरवले. यावेळी उपस्थित सग्या- सोयऱ्यांनी देखील रूढी परंपरेला फाटा देत याला संमती दर्शविली. त्यानंतर अंत्यसंस्कार समई मिना अंकुश सानप, सुनिता संतोष नागरे, काजल सुखदेव घुगे या तीन मुलीनी पित्याला मुखाग्नि दिला आहे.
एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याला खांदा देण्याचा आणि मुखाग्नी देण्याचा मान पुरुषांनाच असतो. मात्र शेडगाव या गावात ही परंपरा या तीन उच्चशिक्षित बहिणींनी मोडीत काढली आहे.
दरम्यान विशेष म्हणजे कोरोनाचे सर्व नियम पाळून मोजक्या लोकानमध्ये हा अंत्यविधी पार पडला असून यावेळी गावातील ग्रामस्थं, नातेवाईक व मित्रपरिवार उपस्थित होता. याप्रसंगी परंपरेची बंधने झुगारून धाडस दाखवणाऱ्या या तीन बहीनीचे शेडगाव सह पंचक्रोशीतून सर्वत्र कौतुक होत आहे.
आमचे वडील आमच्यावर आभाळाऐवढी माया करत होते. मुलगा व मुलगी त्याना समान असल्याने त्याना मुलगा नसल्याची खंत कधी वाटली नाही. त्यामुळे वडीलाचे अंत्यसंस्कार आम्ही तिन्ही बहिनीनी ग्रामस्थं व नातेवाईक याच्या सहकार्यतून पुर्ण केले असून दशक्रिया विधी दरम्यान पिडं दान विधी ही आम्हीचं करणार असल्याची भावना मुलगी मिना अंकुश सानप यानी व्यक्त केली आहे.