◻ माळेवाडी येथिल माधव गिते यांचा मृत्यू ; सेवा फळाला आल्याची कुटुंबीयाची भावना.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथिल सप्तश्रृंगी मंदिरात मागील ४० वर्षापासून सेवाकार्य करत असलेल्या माधव तुकाराम गिते (वय - ८१) यांचे नवरात्र काळात देवीपुढे हवन सुरु असताना नतमस्तक होताना ह्रदय विकाराचा जोरदार झटका बसल्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे निस्वार्थ सेवा कार्यामुळे देवीच्या दारातचं मृत्यू झाल्याचे भाग्य गिते याना लाभल्याची चर्चा आश्वी परिसरातील नागरीकानसह भक्तानमध्ये सुरु आहे.
याबाबत स्थानिकाकडून मिळालेली माहिती अशी की, आश्वी बुद्रुक येथे धार्मिक क्षेत्रात मोठे काम केलेल्या माता सोनाई यानी माधव गिते याने पुत्र मानले होते. घरची परिस्थिती हालाकीची असली तरी गिते यानी माळेवाडी (शिबलापूर, ता. संगमनेर) शिवारात कष्टातून माळरानावर नंदनवन फुलवत प्रगती साधली. याकाळात त्यानी शिक्षित व आदर्श पिढी घडवण्याचे कार्य केल्यामुळे परिसरात त्यानी नाव-लौकिक ही मिळवला.
मागील ४० वर्षापासून सोनाई मातेच्या सांगण्यावरुनचं गिते हे आश्वी बुद्रुक येथिल सप्तशृंगी मंदिरात सेवा कार्य करत होते. या मंदिर जिर्णोद्धारासाठी मोठी मदत त्यानी दिली होती. तसेच प्रत्येक वर्षी नवरात्र काळात ७ व्या माळेला होम-हवन, पुजा आर्चा, धार्मिक विधी व फराळ वाटप कुटुंबियासमवेत मोठ्या उत्साहाने अखंडपणे करत होते. नुकत्याचं संपन्न झालेल्या नवरात्र उत्सवातील ७ व्या माळेला (बुधवार) होमहवन विधी सुरु असताना माधव गिते याना ह्रदय विकाराचा तीव्रं झटका बसल्यामुळे त्याना उपस्थित ग्रामस्थं व कुटुंबियानी लोणी येथिल प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतू उपचारापुर्वीचं त्याचा मृत्यू झाला.
माधव गिते हे निस्वार्थ भावनेतून करत असलेल्या सेवा कार्यामुळे देवीच्या दारातचं मृत्यू होण्याचे भाग्य त्याना लाभल्याचे व सेवा फळाली आल्याची चर्चा आश्वी परिसरात सुरु असून कुटुंबियानीही हिच भावना बोलून दाखवली आहे. दरम्यान माधव गिते याच्यां पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, तीन मुली, जावई व नातंवडे असा मोठा परिवार असून शिक्षक भाऊसाहेब गिते, भास्कर गिते, संतोष गिते याचे ते वडील होते.