◻ लोणी बुद्रुक येथे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पुढाकाराने डे नाईट जिल्हास्तरीय टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.
संगमनेर Live (लोणी) | जिल्हास्तरीय आमदार चषक टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेट खेळाडूना चांगली संधी मिळाली आहे. खेळाडूचा सहभाग आणि उत्साह पाहता या स्पर्धेचा नावलौकीक वाढत असल्याचे प्रतिपादन आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
लोणी बुद्रुक येथील मैदानावर खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पुढाकाराने डे नाईट जिल्हास्तरीय टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा शुभारंभ आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी ग्रामपंचायतीसह सर्व संस्थांचे पदाधिकारी आणि क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.
याप्रसंगी संपतराव विखे, यशवंत विखे, सिनेट सदस्य अनिल विखे, उपसरपंच गणेश विखे, माजी सरपंच लक्ष्मण बनसोडे, अनिल विखे, अॅड. नितीन विखे, गणेश विखे, भाऊसाहेब विखे, भाऊसाहेब धावणे, राहुल धावणे, डॉ. राहुल विखे, रामभाऊ विखे, एस. पी. आहेर, एन. डी. विखे, संतोष विखे, अनिल विखे आदीसह मान्यवर व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोणी येथे जिल्हास्तरीय आमदार चषक टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जाते. कोव्हीड संकटामुळे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले नव्हते. यंदा मात्र नियम शिथील झाल्याने मोठ्या उत्साहात या स्पर्धेचे आयोजन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. स्पर्धेतील पहीला सामना मोनेटा रेक्स आणि श्रीरामपूर वकील संघ यांच्यात खेळविण्यात आला. आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दोन्ही संघाना शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेचा नावलौकीक वाढला आहे. जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूना या स्पर्धेमुळे संधी मिळाली असल्याने ग्रामीण भागातील खेळाडूचा या स्पर्धेतील सहभाग महत्वपूर्ण असल्याचे आ. विखे पाटील यावेळी म्हणाले.