संगमनेर Live | वीर वस्ताद लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त रविवारी संगमनेर तालुक्यातील आश्वीसह पंचक्रोशीतील विविध गावानमध्ये विविध संघटना व कार्यकर्त्याच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी दाढ खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात वस्ताद लहुजी साळवे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक हभंप शांताराम महाराज जोरी, मा. संचालक नारायणराव कहार, लोकनियुक्त सरपंच सतिशराव जोशी, लहुजी सेनेचे जेष्ठ नेते दगडू साळवे, मा. चेअरमन कारभारी गो. जोशी, भागवत जोरी, निलेश जोशी, दत्तात्रय जोशी, भगवान मेहेरे, तुकाराम पर्वत, संतोष बिरे आदिनी अभिवादन करत त्याच्या कार्याचा गौरव केला.