संगमनेर Live (अहमदनगर) | निशांत दिवाळी अंकाची २२ वर्षांची अखंड परंपरा निश्चित कौतुकास्पद असून, मुंबई पुण्याच्या दिवाळी अंकासोबतच नगरच्या अंकाची स्पर्धा होते, हे निश्चितच भुषवाह आहे. २२ वर्षांत ५८ राज्यस्तरीय पुरस्कार पटकावत अनेक साहित्य संमेलनात निशांत दिवाळी अंकाचा गौरव होतो यावरुन अंकाचा दर्जा समजतो. सर्वाकष विषयांना स्पर्श करणारा दिवाळी अंक म्हणून राज्यात आपले वेगळेपण जपले आहे. सध्याच्या कोरोना व पोलिस दलातील प्रतिमे संदर्भात मान्यवरांचे लेख निश्चित वाचनिय असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केले.
‘निशांत दिवाळी’ अंकाचे प्रकाशन विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते अहमदनगर येथील विश्रागृहावर झाले. याप्रसंगी माजी गृहमंत्री प्रा. राम शिंदे, भाजपाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुुंडे, शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, संघटन सरचिटणीस अॅड. विवेक नाईक, तुषार पोटे, जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य बाबा सानप, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी आदिंसह संपादक निशांत दातीर उपस्थित होते.
यावेळी माजी गृहमंत्री प्रा. राम शिंदे म्हणाले, निशांत दिवाळी अंकाच्या २२ वर्षाच्या प्रवासातील तब्बल दोन तपाहून अधिक दिवाळी अंकाचे प्रकाशन माझ्या हस्ते झाले याचा मला मनस्वी आनंद आहे. दरवर्षी वेगवेगळ्य विषयांना स्पर्श करणार्या लेखांमुळे वर्षभर हा अंक संग्रही असतो.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगरसेवक ते मुख्यमंत्री व सरपंच ते गृहमंत्री या दोन लेखांचे २०१५ साली केंद्रीय नेतृत्वाने विशेष कौतुक केले होते. सामान्य वाचकांबरोबरच राजकारणी लोकांनाही या दिवाळी अंकाचे आकर्षण राहिले आहे. तब्बल २२ वर्षे अंकाचा दर्जा टिकून ठेवणे फार मोठे आव्हान संपादक निशांत दातीर यांनी पेलावले आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनीही निशांत दिवाळी अंकाचे कौतुक करुन संपादक निशांत दातीर यांना शुभेच्छा दिल्या. प्रास्तविकात निशांत दातीर यांनी अंकाची माहिती दिली. शेवटी कार्यकारी संपादक प्रा. गणेश शिंदे यांनी आभार मानले.