◻ स्थानिककासह जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती व संस्थाना मदतीचे आवाहन.
संगमनेर Live | ६ नोव्हेंबर रोजी नगर येथील जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आग्नीमध्ये तब्बल ११ उपचार सुरु असलेल्या रुग्णाना जीव गमवावा लागला होता. यामध्ये संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथिल दिपक विश्वनाथ जेडगुले (वय - ३७) या तरुणाचा ही दुर्दैवी मृत्यू झाला होता. शासनाने जाहिर केलेला ५ लाख रुपये मदतीचा धनादेश या कुटुंबाला प्रशासकडून मिळाला असला तरी त्याची घरची परिस्थिती, उपचारासाठी झालेला खर्च व त्यातून निर्माण झालेला कर्जाचा डोगंर पाहता ही मदत तुटंपुजी असल्याने शासनाने जेडगुले कुटुंबाला १० लाखाची मदत करुन कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरीत सामावून घ्यावे. अशी मागणी आश्वी खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते अँड. अनिल भोसले यानी केली आहे.
आठवडा भराचा काळ उलटत आला असताना ही मयत दिपक जेडगुले कुटुंबाची शासनातील कोणत्याही मंत्र्याने अथवा प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्याने साधी भेट घेऊन सात्वंन ही केले नाही. त्यामुळे शासन व प्रशासनाच्या बेगडीपणावर अँड. भोसले यानी कडाडून टिका केली आहे. मयत जेडगुले यांच्या कुटुंबाचे उपचारासाठी साडेचार ते पाच लाख रुपये खर्च झाले आहेत. यामुळे कर्जाचा मोठा डोगंर या कुटुंबाच्या डोक्यावर असताना घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे हे कर्ज कसे फेडायचे हा मोठा प्रश्न त्याच्यापुढे उभा राहिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मंत्र्यासह पालकमंत्र्यानी स्वतः मयत कुटुंबाच्या घरी भेट द्यावी म्हणजे वस्तुस्थिती त्याच्या लक्षात येईल असेही अँड. भोसले यानी म्हटले आहे.
दरम्यान शासनाने ५ लाखाची मदत वाढवून ती १० लाख रुपये करावी व कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे म्हणजे त्या कुटुंबाला आधार प्राप्त होईल. तसेच स्थानिकासह जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती व संस्थानीही जेडगुले कुटुंबाला मदतीचा हात द्यावा असे आवाहन अँड. अनिल भोसले यानी केले आहे.
आमचे नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील व खा. सुजय विखे पाटील हे जेडगुले कुटुंबाची वेळोवेळी माहिती घेत असून या कुटुंबाला सर्वोतीपरी मदत करणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री यानीही आमच्या मागण्याचा माणूसकीच्या भावनेतून विचार करुन या कुटुंबाला आधार द्यावा ही विनंती.
अँड. अनिल भोसले
मा. संचालक, पद्मश्री विखे पाटील सह. साखर कारखाना रा. आश्वी खुर्द