दोन दिवसात आश्वी परीसरातील विद्युत पुरवठा सुरळीत करा - सरुनाथ उंबरकर

संगमनेर Live
0
..अन्यथा रास्तो रोको आंदोलन करण्याचा दिला महावितरणला इशारा.

संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी परिसरात मागील चार ते पाच महिन्यापासून सुरु असलेल्या वीजेचा खेळ खंडोबा थाबूंन वीज पुरवठा पुर्ण दाबाने सुरळीत करावा यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सरुनाथ उंबरकर यानी आक्रमक भुमिका घेत महावितरणला वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास संगमनेर - कोल्हार - घोटी राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. तर ना. प्राजक्त तनपुरे याच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करत थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रांर करणार असल्याचे म्हटल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत सरुनाथ उंबरकर यानी दिलेल्या प्रसिध्दिपत्रकात म्हटले आहे की, संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे दोन तिन ३३ के. व्ही. सबस्टेशनचे मार्फत कृषीपंप, घरगुती व व्यवसायीक यांना विद्युत पुरवठा महावितरणाचे मार्फत केला जातो. हा भाग बारमाही बागायती असल्याने शेती व्यवसाय व दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. या परिसरातील शेतकरी व घरगुती वीजग्राहक प्रमाणिकपणे वीज बिल भरतात. मात्र बोगस मिटर रिडींगचे तक्रारी बिले वगळता ग्राहकांचे मोठे सहकार्य महावितरणाला विजबिल भरून केले जाते.

गेल्या दहा ते पंधरा वर्षात जिल्हयातील बाभळेश्वर १३२ के. व्ही. अंतर्गत येणारे ७० ते ७५ सबस्टेशन पैकी सर्वात जास्त वीज वसुली आश्वी सबस्टेशनची असते. मात्र या भागात गेल्या चार ते पाच पहिन्यापासुन विजपुरवठा कमी दाबाने होतो. नेहमीच ट्रीपींग येऊन विज पुरवठा खंडीत होतो. सबस्टेशनचे अथवा बाभळेश्वर ते आश्वी दरम्यान विद्युत वाहक तारा व पोल यावर होणारे फॉल्ट यामुळे अनेक वेळा चार तास ते दोन तासच लाईट ग्राहकांना मिळते. त्यामुळे संतप्त जनता नाराज असल्याने विजबिल भरण्यास टाळाटाळ करीत आहे. या भागात गेल्या पंधरा दिवसापासुन कृषीपंपाना फक्त चार तास विद्युत पुरवठा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे मोठे नुकसान होत आहे. एक तर कोवीड - १९ च्या प्रार्दुभावामुळे दवाखान्याचा खर्च आणि अल्प प्रमाणात उत्पन्न यामुळे सर्वच शेतकरी व मजुर यांचे कुटूंब जेरीस आलेले आहे.

त्यामध्ये महावितरणाचे कर्मचारी पठाणी वसुली करतांना दिसतात तर दुसरीकडे डी. पी. वर होणारे फॉल्ट जाणुन बुजून काढत नाही. त्यामुळे १२ ते १४ तास काही गावांतील भागातील लाईट बंद राहाते. त्यामुळे पिण्याचे पाणी, गाई व म्हशींना देखील पिण्यासाठी पाणी राहात नाही.

महावितरणचे कर्मचारी लोकांना सरकारच्या धोरणा विषयी चुकीची माहिती देऊन सरकारला बदनाम करत आहेत. तसेच लोकांच्या मध्ये सरकार विषयी व्देषभावना निर्माण करत आहे. त्यामुळे अधिक्षक अभियंता महावितरण अहमदनगर जिल्हा व कार्यकारी अभियंता संगमनेर भाग तसेच डेप्यु. इं. संगमनेर २ यांना मी या पत्रकानुसार सुचित करतो की, आपण आश्वी परिसरातील सबस्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना व विजग्राहकांना आठ तास विद्युत पुरवठा कृषी पंपाना व सिंगल फेज लाईट २४ तास पुर्ण परिसराला देऊन, विस्कळीत झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण आणुन दोन दिवसात विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा मी या भागातील जनतेच्या सहकार्याने संगमनेर- कोल्हार घोटी राज्य मार्गावर रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचे सरुनाथ उंबरकर यानी म्हटले आहे.

तसेच या भागातील शेतकरी अथवा विज ग्राहक कोणतेही विजबिल भरणार नाही. या बाबत जाहीर आवाहन करणार असल्याचे उंबरकर यानी म्हणत विद्युत पुरवठा पुर्णदाबाने आठ तास दिल्यास व सुरळीत केल्यास जनतेमध्ये आम्ही जनजागृती करुन महावितरणाचे विज बिल वसुलीस सहकार्य करण्याचा विश्वास उंबरकर यानी महावितरणला दिला आहे.

दरम्यान उर्जा मंत्री ना. प्राजक्त तनपुरे याना या परिस्थिती बाबत वेळोवेळी माहिती दिलेली असतानाही महावितरणाच्या कामकाजात अद्याप कोणताही बदल अथवा फरक झालेला नाही. मात्र जर त्यांनी आता लक्ष घातले नाही तर त्यांचे बाबत उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचेकडे तक्रार करणार आहे. तरी मंत्री महोदय यांनी वेळीच लक्ष घालुन महावितरणाचे अधिकारी यांना वेळीच समज देऊन दोन दिवसात या भागाचा प्रश्न सोडवुन आठ तास पुर्ण दाबाने विज पुरवठा देण्यात यावा अशी विनंती उंबरकर यानी केली आहे. अन्यथा आम्ही पक्षाचे पदाधिकारी असल्याने आम्ही रस्त्यावर उतरलो तर ते योग्य राहाणार नाही. त्यामुळे सर्व महावितरणचे जबाबदार अधिकारी यांनी आश्वी भागाचा प्रश्न सोडवुन विद्युत पुरवठा सुरळीत करावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सरुनाथ उंबरकर यानी केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !