आदरणिय सा. ग. तथा अण्णासाहेब भोसले पाटील यांचे वाढदिवसांनिमित्तं अभिष्टचितंन.!

संगमनेर Live
0
💥 ९ नोव्हेंबर.. अभिष्टचितंन..

आदरणिय सा. ग. तथा अण्णासाहेब भोसले पाटील

विखे पाटील कुटुंबाच्या समाजकारण, शैक्षणिक व राजकारणातील सर्वात विश्वासू शिलेदार.

अहमदनगर जिल्ह्यातील सहकार चळवळीचे माहेर घर असलेल्या प्रवरा पट्यातील व ऐतिहासीक अशा पेशवेकालीन संस्कृतीच्या पाऊलखुणाचा वारसा लाभलेल्या आश्वी खुर्द (ता. संगमनेर) सह परिसरातील गावानमध्ये सामाजिक, शैक्षणीक, धार्मिकं तसेच राजकीय विकासात आण्णासाहेब भोसले यांनी दिलेले योगदान कोणत्याही शब्दात शब्दबध्द न करता येण्यासारखे अमर्याद व विस्तृत असे असले तरी आज त्याच्या अभिष्टचितंनानिमित्त मी ते धाडस करणार आहे.

समाजकार्याची आवड व सहकाराचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे यांचा आदर्श व प्रेरणा घेऊन पद्मभुषण दिवगंत मा. खासदार डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात आश्वी खुर्द गावासह परिसरात विकास कामे करत असताना विद्यालय तसेच महाविद्यालय सुरु करुन गावचा व परिसराचा शैक्षणिक प्रश्न अण्णासाहेब भोसले यानी सोडवला. 

दहा वर्ष जिल्हापरिषद सदंस्य म्हणुन काम करत असताना गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, पोस्ट कार्यालय, विजेचे सब स्टेशन व आठवडे बाजार अशा जीवनावश्यक सुविधा निर्माण केल्या. विखे कुटुंबाचे प्रवरानदी तिरावरील गावाशी असलेले ऋणानूबंध व येथिल शेतकऱ्याची गरज ओळखून प्रवरा नदीवर कोल्हापूर बंधारा बाधंला जावा यासाठी केलेल्या पाठपुरव्यातून विखे पाटील याच्यां मार्गदर्शनाखाली बाधंण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे येथील अनेक गावाची शेती सुजलाम-सुफलाम झाली आहे.

विशेष म्हणजे महाराष्ट शासनानेही अण्णासाहेब भोसले याना शेतीनिष्ट शेतकारी पुरस्कार देऊन गौरवले आहे. प्रवरा ग्रामिण शिक्षण संस्थेच्या स्थापनेपासुनचे आजतागायत संचालक, विखे पाटील कारखान्याचे माजी संचालक, आश्वी खुर्द सेवा सोसायटीत अनेक वर्ष चेअरमन, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेत व कला वाणिज्य विज्ञान संगणकशास्र महाविद्यालयाचे स्थानिक स्कुल कमेटीचे अध्यक्ष आदि पदावर काम करताना सदैव सर्वसामान्य माणसाचे हित डोळ्यासमोर ठेवून कोणाचाही कधी मुलाहिजा त्यानी ठेवला नाही, त्यामुळे ग्रामपंचायत स्थापनेनतंर आजतागायत आश्वी खुर्द येथील ग्रामस्थ त्याच्या पाठीशी उभे असल्याने विखे कुटुंबाचा विकास कामाचा झेंडा विनाअडथळा डौलाने फडकत आहे. त्यामुळे त्याच्या विषयी मनात मळमळ असलेल्या अनेक व्यक्ती असल्यातरी आण्णासाहेब भोसले हे राजकारण नव्हे तर समाजकारण करणारे रसायन असल्याने त्याचा आदर व स्थान विखे पाटील कुटुंबाने तुसभरही कमी होऊ दिलेले नाही.

माजी पाटबंधारे मंत्री स्व. बि. जे. खताळ पाटील यांना अण्णासाहेब भोसले हे गुरुस्थानी मानत असल्याने त्या दोघाचा वेगळा ऋणानुबंध होता. संगमनेर तालुक्यात असलेला मित्रपरिवार व लोकाशी असलेला दाडंगा जनसंपर्क यामुळे संगमनेर तालुक्याच्या एका विधानसभेच्या निवडणूकीत कॉग्रेसकडून त्यानी उमेदवारीची संधी चालून आली होती. मात्र थेट दिल्लीतून हालचाली झाल्याने त्याची उमेदवारी थोडक्यात हुकल्याची हुरहुर जुने जानते कार्यकर्ते नेहमी व्यक्त करत असतात.

माझा त्यांच्याशी मागील तीन पिढ्यानपासून कौटुंबिक स्नेह व ऋणानूबंध आहे. ते माझे आजोबा आणि मी त्यांचा नातु, म्हणून माझ्यासाठी ते सदैव आदर्श व मार्गदर्शक आहेत. त्यामुळे त्याच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी हा लेख लिहिण्याचा अट्टाहास.. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे मनःपूर्वक अभिष्टचिंतन.!

संजय सुभाष पाटील गायकवाड
पत्रकार तथा माजी उपसरपंच आश्वी खुर्द, ता. संगमनेर
9850981485
श्री स्वामी समर्थ उद्योग समुह, आश्वी खुर्द
संगमनेर Live परिवार
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !