संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील पिप्रीं लौकी येथिल भाऊसाहेब किसन गिते यानी शेती व पाण्यावरुन होणाऱ्या सततच्या वादातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली असून पाच जणाविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा आश्वी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संदीप भाऊसाहेब गीते यानी तक्रांर दाखल केली असून दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास भाऊसाहेब गिते यानी शेताच्या बांधावरील लिबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. शेतीच्या वाटप व सामायिक विहिरीच्या पाण्याचा वापर या कारणांमुळे शारीरिक व मानसिक त्रास तसेच मारहाण व शिविगाळ याला कटाळून गिते यानी आत्महत्या केल्याचे तक्रांरीत म्हटले आहे.
त्यामुळे सोमनाथ गिते, मनीषा गिते, तानाजी गिते, गौरव गिते, स्वाती गिते (सर्व रा. पिप्रीं लौकी, ता. संगमनेर) याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत गुरंव नं १८०/२०२१ नुसार भादंवी कलम ३०६, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचे गाभिऱ्य लक्षात घेता पोलिस निरिक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली तिघाना पोलिसानी ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान रविवारी दुपारी उशीरा शोकाकूल व तणापुर्ण वातावरणात भाऊसाहेब गिते याच्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून यावेळी पोलीसाचा मोठा फौज फाटा उपस्थित होता.