◻ ‘संत ज्ञानेश्वर’ यांची सर्व माहिती, साहित्य एकाच ॲप मध्ये उपलब्ध.
संगमनेर Live | गुरुवार (११ नोव्हेंबर) रोजी देवगड येथे ह. भ. प श्री भास्करगिरी महाराज यांचा हस्ते संत ज्ञानेश्वर ॲपचे अनावरण करण्यात आले. या ॲप मध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांचे संपूर्ण चरित्र, सार्थ ज्ञानेश्वरी, सार्थ हरिपाठ, अभंग गाथा (अनुक्रमणिके प्रमाणे व प्रयाण प्रत), सार्थ पसायदान, अमृतानुभव, विराणी, चांगदेव पासष्टी, ज्ञानदेवा संदर्भातील सर्व तीर्थक्षेत्रांची माहिती इ. साहित्य संत ज्ञानेश्वर या ॲप मध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.
संत ज्ञानेश्वरांच्या संदर्भातील सर्व साहित्य व माहिती एका ॲप मध्ये उपलब्ध होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात येत आहे. या ॲपचा फायदा संत ज्ञानेश्वर व ज्ञानेश्वरी अभ्यासकांना होणार आहे. भजन, कीर्तन सेवेमध्ये अनुक्रमणिका प्रमाणे अभंग शोधणे यामुळे सोपे होणार आहे. तसेच ज्ञानदेवांची इतर साहित्य अमृतानुभव, विराणी, चांगदेव पासष्टी या ॲपच्या माध्यमातून वाचावयास मिळणार आहे.
के. के. टीम या सॉफ्टवेअर कंपनी च्या माध्यमातून या अँप ची निर्मिती झाली आहे. हे ॲप समाजासाठी मार्गदर्शक ठरेल असे अभिप्राय वाचकांकडून मिळत आहेत. ह.भ.प श्री भास्करगिरी महाराज यांनी अनावरण करताना या उपक्रमाची स्तुती करत विशेष अभिनंदन केले. संत साहित्य हे समाजासाठी मार्गदर्शक आहे. व ते पुढील डिजिटल पिढी साठी उपलब्ध करण्याचे काम होत आहे या बद्दल संतोष व्यक्त होत आहे.
‘संत तुकाराम गाथा’ या पासून अँप निर्मिती सुरु केलेली टीम, ज्या अँप चे १ लाख पेक्षा जास्त डाउनलोड्स पूर्ण केले आहेत. नंतर संत साहित्य (santsahitya.in) वेबसाइट च्या मध्यमातुन समाज प्रबोधनाचे कार्य करत आहे. आता संत ज्ञानेश्वर सोबतच, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई, संत सखु, संत सावतामाळी, संत गोरा कुंभार, संत रोहिदास, संत सेना, संत नरहरी सोनार, संत भगवान बाबा,संत जगनाडे व श्री नवनाथ या सर्व अँप चे काम देखील पूर्ण केले आहे. अँड्रॉइड मोबाइल वापरणाऱ्या सर्वांसाठी गूगल प्ले स्टोर वर हे अँप मोफत उपलब्ध आहेत.
या अँप बनवण्यात टीम मधील ओमश्रीनाथ प्रल्हाद म्हस्के, गौरव संतोष डहाळे, संदीप नवनाथ नाकाडे, अनंत राजन अंधाळे, प्रा. किरण अरुण सुपेकर यांचे विशेष योगदान आहे.
App Link :
https://play.google.com/store/apps/details?id=kkteam.santdnyaneshwar